Sat, Jun 06, 2020 15:54होमपेज › Marathwada › संचलनाला जाणाऱ्या दोन विद्यार्थ्यांचा अपघाती मृत्यू

संचलनाला जाणाऱ्या दोन विद्यार्थ्यांचा अपघाती मृत्यू

Published On: Jan 26 2019 5:24PM | Last Updated: Jan 26 2019 5:25PM
अहमदपूर : प्रतिनिधी  

प्रजाकसत्ताक दिनानिमित्त एनसीसी परेडसाठी किनगावहुन अहमदपुरकडे (जि. लातूर) जात असलेल्या दोन विद्यार्थ्यांचा अपघातात मृत्यू झाला. अंबाजोगाई रोडवरील काजळ हिप्परगा जवळ शनिवारी सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास ही घटना घडली. पुजा भोसले (२० वर्ष ) व गोविंद दहिफळे (२१ ) अशी विद्यार्थ्यांची नावे आहेत. 

अहमदपूर येथील महात्मा गांधी महाविद्यालयात ध्वजारोहनानिमित्त एनसीसी परेड होता. या परेडसाठी गोविंद व पूजा मोटारसायकलवरून निघाले होते. अंबाजोगाई रोडवरील उगीलेवाडी पाटीजवळ रोडचे काम चालु असल्याने सर्वत्र धूळ पसरली होती. या धुळीमुळे समोरून येत असलेले वाहन या विद्यार्थ्यांना दिसले नाही. यात अज्ञात वाहनाने दुचाकीला जोराची धडक दिली. या धडकेत हे विद्यार्थी जागीच ठार झाले. 

शिवसेनेचे बालाजी रेड्डी यांना अपघाताची माहिती मिळताच अपघातस्थळी जाऊन जखमी विद्यार्थ्यांना ग्रामीण रूग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच या विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. आमदार विनायकराव पाटील, माजी आमदार बाबासाहेब पाटील, उपजिल्हाधिकारी पांडूरंग कुलकर्णी, उपविभागीय पोलिस आधिकारी आश्विनी शेलार, तहसिलदार अरूणा संगेवार यांनी मयताच्या नातेवाईकांचे सांत्वन केले. रस्त्याचे काम करणाऱ्या कंत्राटदाराच्या चुकीमुळे  हा अपघात झाल्याचा आरोप करीत मयतांच्या नातेवाईकांना नुकसान भरपाई दिल्याशिवाय प्रेत ताब्यात घेणार नाही असा पवित्रा नातेवाईकांनी घेतल्याने ग्रामीण रुग्णालयात तणावाचे वातावरण होते.