Sun, Jun 07, 2020 07:47होमपेज › Marathwada › लातूर : सुट्टीवर आलेल्या जवानाचा अपघाती मृत्यू

लातूर : सुट्टीवर आलेल्या जवानाचा अपघाती मृत्यू

Published On: Jan 08 2019 8:58PM | Last Updated: Jan 08 2019 8:58PM
लातूर : प्रतिनिधी

सुट्टीवर गावी आलेल्या एका जवानाचा अपघातात मृत्यू झाला तर त्यांचा मित्र जखमी झाला आहे. मंगळवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास चापोली नजीक लातूर नांदेड मार्गावर ही दुर्दैवी घटना घडली. सूर्यकांत टाळकुटे ( वय २८) असे मृत जवानाचे नाव असून ते चाकूर तालुक्यातील मष्णेरवाडीचे रहिवासी होते. 

सूर्यकांत हे त्यांचे मित्र योगेश देवकते (वय २९) सोबत (एमएच १५ एम यु ९७६२) दुचाकीवरून चापोली व चाकूर रस्त्यावरून जात होते. भरधाव येणाऱ्या (एमएच २४ एडी ७७७०) कारची धडक दुचाकीला बसली व यात सूर्यकांत गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने चापोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांस मृत घोषित केले. सूर्यकांत हे लेह लडाख येथे कार्यरत होते. १२ जानेवारीला ते कर्तव्यावर रुजू होण्यासाठी लडाखला जाणार होते.