Thu, Oct 17, 2019 13:44होमपेज › Marathwada › महाराष्ट्र केसरी : अभिजित कटकेची शिवराज राक्षेवर सरशी

महाराष्ट्र केसरी : अभिजित कटकेची शिवराज राक्षेवर सरशी

Published On: Dec 21 2018 8:12PM | Last Updated: Dec 21 2018 8:12PM
जालना : प्रतिनिधी

जालना येथे सुरू असलेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत अभिजित कटके याने शिवराज राक्षे याचा गादी गटात पाच विरुद्ध दोन गुणांनी पराभव करीत महाराष्ट्र केसरीवरील आपली दावेदारी भक्कम केली आहे.

आझाद मैदानावर दुपारी झालेली लढत लक्षवेधी ठरली. कटके आणि राक्षसे यांच्यामध्ये झालेल्या या पहिल्याच लढतीकडे अनेकांचे लक्ष होते. कटके याने गेल्या वर्षी दुखापतीमुळे पहिल्याच फेरीतून बाहेर पडलेला शिवराज राक्षेवर विजय मिळवत दुसर्‍या फेरीत प्रवेश केला.