Fri, May 29, 2020 02:40होमपेज › Marathwada › जळगाव : वीज वितरण कंपनीच्या खडका सब स्टेशनला आग

जळगाव : वीज वितरण कंपनीच्या खडका सब स्टेशनला आग

Published On: Nov 10 2018 5:50PM | Last Updated: Nov 11 2018 1:53AMजळगाव : प्रतिनिधी

भुसावळ येथील खडका एमआयडिसी परिसरामधील वीज वितरण कंपनीच्या ट्रान्सफार्मरमध्ये शॉर्ट सर्किट होऊन परिसरामधील गवताला भीषण आग लागली. या आगीत लाखो रुपयाचे नुकसान झाले. ही घटना आज, शनिवार दुपारच्या सुमारास घडली. 

ट्रान्सफार्मरमध्ये शॉर्ट सर्किट होऊन परिसरामधील गवताला भीषण आग लागून महावितरण कंपनीचे करोडो रुपयाचे नुकसान झाले. याची माहिती मिळताच भुसावळ नगरपालिकेच्या अग्निशमन दलाचे २ पाण्याचे बंब घटनास्थळी दाखल होत आग विझवण्याचा प्रयत्न केला. सुमारे दोन तास ही आग आटोक्यात आणण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू होते. या आगीत ४ ट्रान्सफॉर्मर जाळल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.