Tue, Dec 10, 2019 13:43



होमपेज › Marathwada › 'उस्मानाबाद'मध्ये होणार ९३ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 

'उस्मानाबाद'मध्ये होणार ९३ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 

Published On: Jul 22 2019 12:58PM | Last Updated: Jul 22 2019 1:32PM




उस्मानाबाद : प्रतिनिधी

भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे आगामी 93 वे मराठी साहित्य संमेलन उस्मानाबादला होणार आहे. नवीन वर्षात जानेवारी २०२० मध्ये हे संमेलन होणार असल्याची घोषणा साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले -पाटील यांनी सोमवारी (दि.22) पत्रकार परिषदेत केली.

गेल्या आठ वर्षांपासून मराठवाडा साहित्य परिषदेच्या उस्मानाबाद शाखेतर्फे उस्मानाबादेत संमेलन घेण्यासाची मागणी करत होते. उस्मानाबादसारख्या ग्रामीण पार्श्‍वभूमी असलेल्या शहरात यापूर्वी एकही संमेलन झालेले नाही. मात्र, यावेळी स्थळ निवड समितीने नाशिक आणि उस्मानाबाद येथील दोन संस्थांचीच निमंत्रणे पाहणीसाठी निवडली होती. दोन्ही ठिकाणी भेटी देऊन महामंडळाला अहवाल सादर केला. महामंडळाच्या अध्यक्षांनी बैठकीत वेळ खर्च होऊ नये, म्हणून विद्यमान संमेलनाध्यक्ष डॉ. अरुणा ढेरे यांच्यासह सर्व सदस्यांना अहवालासह परिपत्रक पाठवून मते जाणून घेतली. सर्वानुमते उस्मानाबादची निवड करण्यात आली. जानेवारी महिन्यात होणार्‍या संमेलनाच्या तारखा उस्मानाबादकरांशी चर्चा करून निश्‍चित केल्या जातील, अशी माहिती अध्यक्ष कौतिकराव ठाले -पाटील  यांनी दिली.