Sun, May 31, 2020 01:55होमपेज › Marathwada › रमाई आवास योजनेसाठी पं.स.मध्ये सहाशे प्रस्ताव

रमाई आवास योजनेसाठी पं.स.मध्ये सहाशे प्रस्ताव

Published On: Dec 29 2018 1:37AM | Last Updated: Dec 28 2018 10:13PM
पाथरी : प्रतिनिधी

रमाई आवास घरकूल योजनेंतर्गत 2018-19 या वर्षासाठी पाथरी तालुक्यात 49 ग्रामपंचायती अंतर्गत तब्बल सहाशे प्रस्ताव पंचायत समितीकडे दाखल झाले. सध्या पंचायत समिती स्तरावर  प्रस्तावाची छाननी सुरू आहे. 30 नोव्हेंबरपर्यंत परिपूर्ण प्रस्ताव जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाकडे सादर करणे अपेक्षित होते. पण पं.स.कडून अद्याप एकही प्रस्ताव समाजकल्याण विभागाला पाठवण्यात आला नाही.

शासनाकडून दरवर्षी योजनेंतर्गत मागासवर्गीय लाभार्थ्यांना घरकुल मंजूर करण्यात येते. आता रमाई आवास योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना घरकुलासाठी एक लाख वीस हजार रुपये अनुदान देण्यात येत आहे. 2017-18 या वर्षात पाथरी तालुक्यात 628 लाभार्थ्यांना घरकुल मंजूर झाले होते. सध्या ही घरकुलांची कामे प्रगतीपथावर असले तरी लाभार्थींना बांधकाम करण्यासाठी वाळूची मोठी समस्या निर्माण झाली आहे. सन 2018 19 वर्षात पंचायत समितीकडून रमाई आवास योजनेच्या प्रस्तावाची छाननी सुरू करण्यात आलेली आहे 49 ग्रामपंचायती अंतर्गत जवळपास 600 घरकुल प्रस्ताव पंचायत समितीला दाखल करण्यात आले आहेत. मागील महिन्यातील 30 नोहेबरपर्यंत परिपूर्ण प्रस्ताव जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाकडे दाखल करणे आवश्यक  होते. पण या प्रस्तावात ञुटी असल्याने हे प्रस्ताव सबधित ग्रामपंचायतीला परत पाठवण्यात आले आहेत.

प्रस्तावांमध्ये अनेक त्रुटी

रमाई आवास घरकूल योजनेसाठी दाखल केलेल्या प्रस्तावांमध्ये अनेक त्रुटी आहेत. प्रस्तावांसोबत पंचनामे आले नाहीत.त्यामुळे सदरचे प्रस्ताव पुन्हा ग्रामपंचायतीकडे परत केले आहेत.

प्रस्तावांची छाननी सुरू
रमाई आवास घरकूल योजने अंतर्गत लाभार्थींचे प्रस्तावांची सध्या पंचायत समिती स्तरावर छाननी सुरू असून परिपूर्ण प्रस्ताव पुढील कारवाईसाठी समाजकल्याण विभागाकडे दाखल केले जाणार आहेत.
- बी.टी. बायस, 
गटविकास अधिकारी, पाथरी.