Sat, Oct 19, 2019 10:55होमपेज › Marathwada › मातीच्‍या ढिगाऱ्याखाली दबून चुलत्यासह पुतण्या ठार

मातीच्‍या ढिगाऱ्याखाली दबून चुलत्यासह पुतण्या ठार

Published On: Feb 07 2019 1:08PM | Last Updated: Feb 07 2019 1:55PM
केज (जि. बीड) : प्रतिनिधी

शेतात गाळ टाकत असताना मातीचा टिप्पर अंगावर ओतल्‍याने चुलता पुतण्या जागीच ठार झाल्याची घटना भाटुंबा येथे घडली.  बुधवारी पहाटे दोन वाजण्‍याच्‍या सुमारास ही घटना घडली. सर्जेराव बबन धपाटे आणि बंटी हरिदास धपाटे अशी ठार झालेल्‍या चुलता पुतन्याची नावे आहेत. गुरुवारी (दि.७ ) सकाळी या दोघांचे मृतदेह जेसीबीच्‍या मदतीने बाहेर काढण्‍यात आले. 

याबाबत अधिक माहिती अशी, भाटूंबा येथील शेतकरी सर्जेराव धपाटे आपल्या शेतात तळ्यातील माती टाकत होते. माती टाकण्याचे काम रात्रीही सुरू होते. त्यांच्यासोबत त्यांचा पुतण्या बंटी धपाटे देखील होता.  मातीचे टिप्पर भरून येईपर्यंत आपण झोपू म्हणून ते दोघेही आधी टाकलेल्‍या मातीच्या ढिगाऱ्याजवळ झोपले. टिप्पर माती घेऊन परत आला त्‍यावेळी चालकाने पहिल्‍याच ढिगाऱ्यावळ दुसरा टिपर ओतला. त्‍यामुळे सर्जेराव आणि बंदी हे दोघेही या ढिगाऱ्याखाली अडकले.  गुरुवारी सकाळी ही घटना लक्षात आल्‍यानंतर जेसीबीच्या सह्याने दोघांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आले. परंतु, तोपर्यंत त्‍या दोघांचाही मृत्‍यू झाला होता.