Sun, Jun 07, 2020 09:33होमपेज › Marathwada › तब्बल अडीच लाख भाविकांची एकच महापंगत

तब्बल अडीच लाख भाविकांची एकच महापंगत

Published On: Jan 27 2019 7:55PM | Last Updated: Jan 27 2019 7:05PM
बुलढाणा : प्रतिनिधी

राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या तब्बल अडीच लाखापेक्षा अधिक भाविकांनी हिवरा आश्रम येथील विवेकानंद जयंती महोत्सवानिमित्त आयोजित महापंगतीचा रविवारी लाभ घेतला. महाप्रसाद घेण्यापूर्वी लाखो भाविकांच्या जयघोषाने आसमंत दुमदुमून गेला.   

तब्बल ५४ वर्षांची प्रदीर्घ परंपरा लाभलेल्या विवेकानंद जन्मोत्सव सोहळ्याची रविवारी दुपारी पाच वाजण्याच्या दरम्यान तब्बल अडीच लाख भाविकांच्या महापंगतीने सांगता झाली. या महापंगतीने सामूहिक महाप्रसाद सेवनाचा लाभ घेणाऱ्या भाविकांच्या गर्दीचा स्वतःचाच विक्रम मोडित काढला. सामूहिक शिस्तीची भक्ती दाखवत ५० एकर परिसरात एकाच वेळी ५३ पंगती बसल्या होत्या. तब्बल १०१ ट्रॅक्टरद्वारे व चार हजार स्वयंसेवकांनी महाप्रसाद वाटपात सहभाग घेतला. विशेष बाब म्हणजे, कोणतीही अस्वच्छता न करता ही महापंगत उठली. सर्व भाविकांचे विवेकानंद शिक्षण संकुलातील विद्यार्थी, विद्यार्थिनींनी कुंकूम-चंदन तिलक लावून, धूपआरती ओवाळून पूजन केले.