होमपेज › Marathwada › दोन पतसंस्थाविरुद्ध 17 गुन्हे  

दोन पतसंस्थाविरुद्ध 17 गुन्हे  

Published On: Jul 05 2018 1:39AM | Last Updated: Jul 04 2018 10:54PMबीड : प्रतिनिधी

जिल्ह्यात ‘शुभकल्याण’ व ‘परिवर्तन’ ने गुंतवणुकदांची फसवणूक केली. जिल्ह्यात आत्तापर्यंत या दोन्ही मल्टिस्टेटवर एकूण 17 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गुंतवणुकदारांना तब्बल 26 कोटींचा गंडा घातला आहे. विशेष म्हणजे या दोन्ही मल्टिस्टेअचे संचालक मंडळ गेल्या काही महिन्यांपासून फ रार आहेत.

सहा महिन्यांपूर्वी  शुभकल्याण मल्टिस्टेटमधील गैरव्यवहार चव्हाट्यावर आला. या संस्थेच्या संचालक मंडळासह अधिकारी-कर्मचार्‍यांवर सुरू झालेले गुन्ह्यांचे सत्र अद्यापही थांबलेले नाही.  शुभकल्याणवर माजलगाव शहर, संभाजीनगर, आष्टी, केज, धारूर, नेकनूर, वडवणी, बीड शहर, गेवराई, अंबाजोगाई शहर अशा एकूण 10 ठिकाणी फसवणूक व अपहाराचे गुन्हे नोंद आहेत. या संस्थेने सुमारे 15 कोटींना गंडा घातल्याची माहिती उघड झाली आहे. याशिवाय परिवर्तन क्रेडिट को. ऑप. सोसायटीवर तीन महिन्यांपूर्वी पहिला गुन्हा नोंद झाला. त्यानंतर लागोपाठ गुन्हे दाखल होण्यास सुरुवात झाली. आतापर्यंत जिल्ह्यात फसवणुकीचे 7 गुन्हे नोंद झाले आहेत. बीडमधील शिवाजीनगर, माजलगाव ग्रामीण, पाटोदा, माजलगाव शहर, तलवाडा, आष्टी व पिंपळनेर ठाण्यात गुन्हे नोंद असून सुमारे 11 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले आहे.

दोन्ही संस्थांनी मिळून जवळपास एक हजारापेक्षा अधिक ठेवीदारांना फ सविले आहे. मुदत उलटूनही ठेवी परत न मिळाल्याने ठेवीदारांतून ओरड सुरू झाली. त्यानंतर गुन्हे नोंद होण्याचे सत्र सुरू झाले. आर्थिक गुन्हे शाखेतर्फे या गुन्ह्यांचा तपास सुरू आहे, मात्र आतापर्यंत एकाही संचालकास अटक करण्यात आर्थिक गुन्हे शाखेला यश मिळालेले नाही. आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस निरिक्षक प्रशांत शिंदे म्हणाले की.  परिवर्तन  व  शुभकल्याण पतसंस्थेवर अनुक्रमे सात व दहा गुन्हे नोंद आहेत. दोन्ही मल्टिस्टेटने मिळून ठेवीदारांना 26 कोटी रुपयांना फसविल्याचे उघड झालेले आहे. संचालक मंडळांना लवकरच अटक करण्यात येईल.