Sun, Jun 07, 2020 13:48होमपेज › Marathwada › शासकीय, निमशासकीय शेकडो ३ अपत्य धारक कर्मचारी सेवेत

जिल्हा प्रशासन 'त्या' अपात्र कर्मचाऱ्यांची चौकशी करणार का?    

Published On: May 12 2019 4:10PM | Last Updated: May 12 2019 4:02PM
जिंतूर : प्रतिनिधी 

प्रशासनाने लोकसंख्येला आळा घालण्यासाठी यापूर्वीच २८ मार्च २००५ च्या शासकीय परिपत्रकानुसार २८ मार्च २००५ नंतर सेवेत लागलेल्या शासकीय कर्मचाऱ्याना आपल्या विभाग प्रमुखाकडे २ अपत्य असलेले लहान कुटुंबाचे शपथपत्र दाखल करणे कायद्याने बंधनकारक आहे. असे असताना जिंतूर तालुक्यातच काय तर सबंध जिल्ह्यात शासकीय निमशासकीय कार्यलयात चौकशीअंती ३ किंवा 3 पेक्षा जास्त अपत्यधारक शेकडो कर्मचारी बिनधास्त सेवा बजावत असल्याचे धक्कादायक चित्र पाहवयास भेटत आहे.  

कित्येक कर्मचाऱ्यांना २८ मार्च २००५  नंतरही ३  पेक्षा जास्त अपत्य असलेले पुरुष व महिला शासकीय निशासकीय कर्मचारी चौकशीअंती दोषी आढळू शकतील. त्यांच्या अपत्याच्या शाळा निर्गमन उताऱ्यावरून त्यांनी  दाखल केलेल्या लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र खोटे सिद्ध होऊ शकते, अशी शंका भीमसंग्राम सामाजिक संघाचे प्रदेश अध्यक्ष अशोक भालेराव यांनी व्यक्त केली. सदर विषय कर्मचाऱ्याचा असल्यामुळे विभाग प्रमुखाकडून चौकशीचा फास आवळला जात नाही. अशीच संथ गतीची चौकशी असल्यास सेवेत असलेले व २८ मार्च २००५  नंतरही तिसरे अपत्य धारक सर्व अपात्र कर्मचाऱ्यांचे ते रिटायर्ड होई प्रयत्न त्यांना त्या परिपत्रकाची बाधा पोहचणार नाही अशी शक्यता निर्माण झाल्याची भीती सुद्धा अशोक भालेराव यांनी व्यक्त केली.

कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी व  सीईओ यांनी सर्व ३ अपत्यधारक कर्मचऱ्याचा शोध घ्यावा :  आशोक भालेराव
परभणी जिल्ह्यास जिल्हाधिकारी पी. शिवशंकर व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी. पी. पृथ्‍वीराज यांच्या रूपाने कर्तव्यदक्ष अधिकारी लाभलेले आहेत. शासन परिपत्रकाच्या अधिन राहून जिंतूर तालुक्यासह सबंध परभणी जिल्ह्यातील  सेवेत असलेल्या व २८ मार्च २००५  नंतरही ३  रे अपत्य झालेल्या सर्व अपात्र कर्मचाऱ्यांची तात्काळ चौकशी करून नियमानुसार कार्यवाही करावी. कारण कायदा हा सर्वांसाठी समान असतो कारण बेरोजगारांना नोकरी भेटण्यापूर्वीच लहान कुटूंबाचे शपथ पत्र द्यावे लागते व  सर्व नियमातुन जावे लागते.  तर सुशिक्षित बेरोजगारासाठी नोकरी मिळण्याअगोदर लहान कुटंबाची अट असेल तर ही अट कार्यरत कर्मचाऱ्यासाठी का नसावी असा प्रश्न अशोक भालेराव यांनी उपस्थित केला आहे