होमपेज › Konkan › सिंधुदुर्गच्या 2 कन्यांचा मुंबई पूल दुर्घटनेत बळी

सिंधुदुर्गच्या 2 कन्यांचा मुंबई पूल दुर्घटनेत बळी

Published On: Mar 16 2019 1:57AM | Last Updated: Mar 15 2019 11:33PM
देवगड/विजयदुर्ग ः वार्ताहर        

मुंबईत सीएसटी परिसरात पादचारी पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेत सिंधुदुर्गच्या कन्येचा दुर्दैवी मृत्यू झाला. विजयदुर्ग- जुनाबाजार येथे माहेर व वेंगुर्ले- नवाबाग येथे सासर असलेल्या अपूर्वा अभय प्रभू (वय 35) व देवगड-मिठमुंबरी येथील भक्‍ती शिंदे (40) यांचा समावेश आहे. यामुळे देवगड, मालवण व वेंगुर्ले परिसरात शोककळा पसरली आहे. या दोघीही मुंबईतील जी. टी. रुग्णालयात नर्स म्हणून कामाला होत्या. रात्रपाळीला जाण्यासाठी त्या निघाल्या असताना काळाने त्यांच्यावर घाला घातला. 

 नवाबाग येथील अभय पुरुषोत्तम प्रभू हे कामानिमित्त मुंबई-डोंबिवली येथे वास्तव्यास आहेत. त्यांच्या पत्नी अपूर्वा प्रभू या जी. टी. रुग्णालयात नर्स म्हणून कार्यरत होत्या. गुरुवारी सायंकाळी ड्युटी संपवून घरी परतत असताना पादचारी पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेत त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांच्या पश्‍चात पती, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. सौ. प्रभू यांचे माहेर विजयदुर्ग -जुनी बाजारपेठ येथील दत्तमंदिर येथे असून त्यांचे पूर्वाश्रमीचे नाव ममता विठ्ठल कोंयडे असे आहे. 

मृतांत राजापूरची परिचारिका

ओव्हर ब्रिज कोसळून मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये मूळच्या राजापूर तालुक्यातील ससाळे येथील एका परिचारिकेचा समावेश आहे. रंजना तांबे असे तिचे नाव आहे. ती मूळची ससाळे गावची रहिवासी होती. 

WhatsApp वर बातम्या मिळवण्याकरीता ८८०५००७७२२ हा नंबर तुमच्या मोबईलमध्ये पुढारी या नावाने सेव्ह करा आणि खालील लिंकवर क्लिक करून WhatsApp ग्रुप जॅाईन करा.
https://chat.whatsapp.com/DmOJLDvGACrHCXh0bqURex