होमपेज › Konkan › रत्नागिरी-सिंधुदुर्गात रंगणार चौरंगी लढत

रत्नागिरी-सिंधुदुर्गात रंगणार चौरंगी लढत

Published On: Mar 27 2019 1:52AM | Last Updated: Mar 28 2019 1:38AM
रत्नागिरी : प्रतिनिधी

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात सेना-भाजप युती विरोधात काँग्रेस आघाडी, स्वाभिमान व वंचित बहुजन विकास आघाडी अशी चौरंगी लढत निश्‍चित झाली आहे. सेना-भाजप युतीचे उमेदवार खा. विनायक राऊत व काँग्रेसचे उमेदवार नवीनचंद्र बांदोडकर हे दि. 30 मार्च रोजी, स्वाभिमानचे उमेदवार नीलेश राणे व वंचित बहुजन विकास करण्यात आली आहे.रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघामध्ये सेना विरुद्ध स्वाभिमान अशी ‘काँटे की टक्‍कर’ अपेक्षित असतानाच काँग्रेस व वंचित बहुजन विकास आघाडीने उमेदवारी दिल्यामुळे ही लढत चौरंगी होणार आहे. 

रत्नागिरी-सिंधुदुर्गसाठी 23 एप्रिलला मतदान होत आहे. यासाठी  दि. 28 मार्च ते 4 एप्रिल या कालावधीत उमेदवारी दाखल करण्यासाठी मुदत आहे. युतीचे उमेदवार खासदार विनायक राऊत हे 30 मार्च रोजी अर्ज भरणार आहेत. त्यानंतर हॉटेल विवेकच्या मैदानावर युतीच्या पदाधिकार्‍यांची सभा होणार आहे. यावेळी म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत, सिंधुदुर्गचे पालकमंत्री दीपक केसरकर, आमदार वैभव नाईक, आ. राजन साळवी, आ. सदानंद चव्हाण यांच्यासह भाजप, आरपीआयचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

काँग्रेस आघाडीचे उमेदवार नवीनचंद्र बांदिवडेकर हेही दि. 30 मार्च रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. बांदिवडेकर यांच्या प्रचाराच्या दृष्टीने राजकीय धोरण ठरविण्याकरिता चिपळुणातील 
ब्राह्मण सहाय्यक संघाच्या बेडेकर सभागृहात दि. 29 मार्च रोजी दुपारी 3 वा. काँग्रेस, राष्ट्रवादी व आघाडीतील अन्य घटक पक्षांच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली असल्याचे जिल्हाध्यक्ष रमेश कदम यांनी सांगितले. बांदिवडेकर यांचा अर्ज भरताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण हे उपस्थित राहणार असल्याची चर्चा काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांमध्ये सुरु आहे.महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे सरचिटणीस आणि माजी खा. नीलेश राणे हे येत्या 1 एप्रिल रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार 

आहेत. यावेळी खा. नारायण राणे, देवगडचे आ. नितेश राणे यांच्यासह  महाराष्ट्र सिंधुदुर्गचे जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत, रत्नागिरीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र नागरेकर, मंगेश शिंदे, डॉ. मिलिंद कुलकर्णी यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते हेही उपस्थित राहणार आहेत. रत्नागिरीमध्ये महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे.वंचित बहुजन विकास आघाडीच्यावतीने कुणबी समाजातील ज्येष्ठ पदाधिकारी मारुती जोशी यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तेही 1 एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी बहुजन समाजाकडून मोठी रॅली काढली जाणार आहे. 

गीते 28 तर तटकरे 29 रोजी अर्ज भरणार

रायगड लोकसभा मतदार संघामध्ये सेना-भाजप युतीकडून केंद्रीय मंत्री अनंत गीते दि. 28 मार्च रोजी अर्ज भरणार आहेत. यावेळी सेनेकडून शक्‍तीप्रदर्शन केले जाणार आहे. महाडचे सेना आमदार भरत गोगावले यांच्यासह शिवसेना-भाजपाचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रवादीकडून सुनील तटकरे दि. 29 रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार असून यावेळी गुहागरचे आमदार भास्कर जाधव, दापोलीचे आमदार संजय कदम यांच्यासह काँग्रेस-राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.