Sat, Jul 04, 2020 18:15होमपेज › Konkan › रायगड : तब्बल ५७ उपकेंद्रातील वीज पुरवठा खंडीत

रायगड : तब्बल ५७ उपकेंद्रातील वीज पुरवठा खंडीत

Last Updated: Jun 03 2020 2:31PM
नवी मुंबई: पुढारी वृतसेवा 

निसर्ग चक्रीवादळाचा तडका रायगड जिल्ह्याला बसला असून महावितरण विभागाने हे वादळाच्या मार्गात येणारी रायगड जिल्ह्यासह उरण आणि पनवेल विभागातील 57 उच्च आणि अतिउच्च दाबाने विद्युत पुरवठा करणा-या उपकेंद्रातील विद्युत पुरवठा खंडीत केला आहे.

रायगड जिल्ह्यातून या चक्रिवादळाला दुपारी सुरूवात झाली. यावेळी पोल पडणे, विद्युत वाहिन्या कोसळणे आदी घटना घडण्याची दाट शक्याता आहे. त्यामुळे महावितरणाने रायगडमधील 46, उरण 30 आणि पनवेल विभागातील 08 अतिउच्च व उच्च दाबाचे उपकेंद्रातील पुरवठा बंद केला आहे. दुपारी तीन वाजेपर्यंत हे वादळ या जिल्ह्यातून वाहणार असल्याने तोपर्यंत विद्युत पुरवठा खंडीत राहणार आहे.  तीनंतर जसजसे वादळ पुढे सरकेल त्यानुसार हळूहळू विद्युत पुरवठा सुरू करण्याबाबत स्थानिक कार्यालयाकडून प्रयत्न केला जाणार आहे. 

कल्याण परिमंडळ मधील विद्युत पुरवठा सुरळीत सुरू असून भांडुप परिमंडळात वाशी विभागात वाशी स्टेशन,  जुहूगाव, कोपरखैरणे, ऐरोली, बेलापूर आणि तुर्भे विभागातील विद्युत पुरवठा खंडीत करण्यात आला आहे. तर कोकण विभागात रायगड व्यतिरिक्त इतर कुठल्याही जिल्ह्यातील पुरवठा खंडीत केला नसल्याचे सांगण्यात आले.  ठाणे ग्रामीण, नाशिक ग्रामीण, नाशिक शहर, मालेगाव, धुळे, जळगाव हे जिल्हे कोकण विभागात आहेत.