Tue, Sep 17, 2019 04:13होमपेज › Konkan › ‘नाणार’ असता तर कोकण उद्ध्वस्त झाले असते

‘नाणार’ असता तर कोकण उद्ध्वस्त झाले असते

Published On: Mar 05 2019 1:44AM | Last Updated: Mar 04 2019 11:04PM
खेड : प्रतिनिधी

नाणार प्रकल्प झाला असता तर संपूर्ण कोकणच उद्ध्वस्त झाले असते. आता लोटे एमआयडीसीमुळे होणारे जल प्रदूषण कमी करण्यासाठी दहा कोटी रुपये खर्चून जलशुद्धीकरण प्रकल्प उभारला जाणार आहे, अशी माहिती पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी कोतवली येथे दिली.

सोमवारी (दि. 4) आयोजित वाशिष्ठी नदी स्वच्छता प्रकल्पाच्या भूमिपूजन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे सदस्य सचिव ई रवींद्रन, सहसंचालक डॉ. यशवंत सोनटक्के, शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन कदम, उपजिल्हा प्रमुख शंकर कांगणे, जि. प. सदस्य अरुण कदम, तालुकाप्रमुख राजा बेलोसे, कोतवालीचे सरपंच संदीप आंब्रे आदींसह शिवसैनिक व ग्रामस्थ उपस्थित होते.

पर्यावरण मंत्रालय आणि प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या वतीने दहा कोटी रुपयांची तरतूद करून वाशिष्ठी नदीच्या स्वच्छतेसाठी विशेष प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. त्यासाठी पथदर्शी प्रकल्पाचा शुभारंभ दि.4 रोजी करण्यात आला. या प्रकल्पाबाबत माहिती देताना डॉ. यशवंत सोनटक्के म्हणाले, पर्यावरणमंत्री रामदास कदम यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील 25 नद्यांचे पाणी प्रदूषित होण्यापासून रोखण्यासोबतच ते शुद्ध करण्यासाठी उपाययोजना करण्यात येत आहेत. त्याचाच भाग म्हणून वाशिष्ठी नदी स्वच्छतेसाठी पथदर्शी प्रकल्प उभारण्यात येत आहे. या प्रकल्पातून 10 दशलक्ष लिटर पाण्यासाठी एक प्रकल्प उभारण्यात येणार असून असे एकूण 5 प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. त्यासाठी एका प्रकल्पाला सूमारे दीड ते दोन कोटी असे एकूण 10 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. या प्रकल्पाच्या माध्यमातून 2 ते 3 एमएलडी पाणी शुद्धीकरण करून नदीतील प्रदूषण दूर करण्यात येईल. लोटे औद्योगिक वसाहतीतून वाशिष्ठी नदीमध्ये जाऊन मिसळणा़र्‍या नाल्यांवर हा पथदर्शी प्रकल्प उभारण्यात येणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली. 

यावेळी ना. कदम म्हणाले, बाळासाहेबांनी कोकणावर प्रेम केले व कोकणी माणसाने देखील शिवसेना भक्‍कम केली आहे. सन1995च्या शिवशाहीच्या सत्तेत देखील कोकणी जनतेला झुकते माप देण्यात आले होते. राष्ट्रवादी-काँग्रेसचे पाप असलेली लोटे रसायानीक औद्योगिक वसाहत असली तरी त्यातील प्रदूषण कमी करण्यासाठी शिवसेनेच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत. सीईटीपी प्रकल्प सक्षम करण्यासोबतच आता वाशिष्ठी नदी प्रदूषण विरहीत करण्यासाठी 10 कोटींचा निधी देण्यात आला आहे. 

नद्यांच्या स्वच्छतेसाठी केंद्राकडे प्रस्ताव

वाशिष्ठीच्या उगमापासून खाडीपर्यंतच्या भागात या प्रल्पांतर्गत विविध उपाययोजना करण्यात येणार आहेत. जगबुडी नदीच्या स्वच्छतेला देखील पुढील महिन्यात सुरुवात होणार आहे. राज्यातील लहान-लहान अनेक नद्यांच्या स्वच्छतेसाठी आपण 6 हजार कोटींचा प्रस्ताव तयार करून केंद्राकडे पाठवला असल्याचेही यावेळी ना. कदम यांनी सांगितले. 

WhatsApp वर बातम्या मिळवण्याकरीता ८८०५००७७२२ हा नंबर तुमच्या मोबईलमध्ये पुढारी या नावाने सेव्ह करा आणि खालील लिंकवर क्लिक करून WhatsApp ग्रुप जॅाईन करा.
https://chat.whatsapp.com/DmOJLDvGACrHCXh0bqURex