Fri, Sep 20, 2019 21:27होमपेज › Konkan › झाडावर कार धडकून चालक गंभीर जखमी

झाडावर कार धडकून चालक गंभीर जखमी

Published On: Mar 15 2018 7:05PM | Last Updated: Mar 15 2018 7:05PMआंबोलीः प्रतिनिधी

आंबोलीतील आजरा फाटा येथून सुमारे २०० मीटरवर असलेल्या आजरा रोड येथे आज (गुरूवार) दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास टाटा इंडिका गाडीला अपघात झाला. या अपघातात चालक गंभीर जखमी झाला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, टाटा इंडिका (एम एच ०७ क्यू ५२०९ ) गाडीवरील चालकाचा ताबा सुटून झाडावर आदळली. यामध्ये चालक मल्लिकार्जुन अण्णासाहेब चौगुले (वय ३४ रा. हत्तरगे, ता. गडहिंग्लज) हे गंभीर जखमी झाले. त्यांना तत्काळ १०८ रुग्णवाहिकेने आंबोली आरोग्य केंद्रात आणल्यावर प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी गडहिंग्लज येथे हलवण्यात आले. या अपघातात इंडिका गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. अपघात झाला त्यावेळी गाडीत मल्लीकार्जुन चौगुले एकटेच होते. संध्याकाळी उशीरापपर्यंत या अपघाताची नोंद पोलिसात झाली नव्हती.