Wed, Feb 20, 2019 14:52होमपेज › Konkan › 'सावडाव' घालतोय पर्यटकांना साद.. (video)

'सावडाव' घालतोय पर्यटकांना साद.. (video)

Published On: Jul 12 2018 5:10PM | Last Updated: Jul 12 2018 5:14PMनांदगाव : वार्ताहर

दमदार पडणा-या पावसाचा आनंद घेण्यासाठी सध्या वर्षा पर्यटक सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुरक्षित धबधबा म्हणुन ओळख असलेल्या कणकवली तालुक्यातील मुंबई गोवा महामार्गालगत असणाऱ्या सावडाव धबधब्याला पसंती देत असून पावसामुळे वर्षा सहलींसाठी पर्यटकांना आकर्षित करत असलेला सावडाव धबधबा पूर्णपणे प्रवाहीत झाला आहे. एरवी  सुट्टीच्या दिवशी गजबजलेल्या सावडाव धबधब्यावर बुधवारी दिवसभर लागणार-या पावसातही पर्यटकांनी मोठया प्रमाणात गर्दी करून मनसोक्त आनंद लुटला. 

Image may contain: one or more people, outdoor and nature

सावडाव धबधब्याची निर्मिती होण्यासाठी 1975 सालापासून सावडाव गावचे सुपुत्र माजी केंद्र प्रमुख रघुनाथ कामतेकर गुरूजी व ग्रामस्थ यानी विशेष प्रयत्न करून सुरुवात केली. सावडावच्या खांदारवाडी सीमेवर असलेल्या दिर्बादेवी मंदिराच्या दिर्बा ओहळावर उगम असलेला हा धबधबा पाझर धबधबा आहे. पूर्वी राजाराणी धबधबा म्हणून ओळखला जायचा. कारण एका बाजूला स्त्रिया व एका बाजूला पुरूषांना आंघोळ करण्याची व्यवस्था त्यावेळी करण्यात आली होती. म्हणून या धबधब्याला राजाराणी धबधबा म्हणून नाव पडले होते. कालांतराने धबधब्याकडे जाण्याचा मार्ग तितकासा चांगला नव्हता. तेव्हा फक्त स्थानिक व माहितगार लोक येत असत. गेली पंधरा वर्षांत प्रसिद्धीच्या प्रकाश झोतात आलेल्या सावडाव धबधब्याचा २०१० साली पर्यटन विकास महामंडळाच्या यादीत 'क' वर्ग पर्यटन स्थळ म्हणून समाविष्ट करण्यात आला. तेव्हापासून सावडाव धबधब्याकडे विशेष लक्ष देवून पायाभूत सुविधा निर्माण करण्यात आल्या. सावडाव ग्रामपंचायत व ग्रामस्थ यानी जास्तीत जास्त सुविधा पर्यटकांना आकर्षित करतील यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

Image may contain: outdoor and nature

सध्या लोंखडी रॅम्प, बाथरूम अशा सुविधा उपलब्ध आहेत. आतापर्यंत सावडाव धबधब्याला परीसारात जाण्यासाठी १० लाखाचा स्टिूटलाईटसाठी निधी मंजूर झालेला असून सदर काम आजही प्रगतीपथावर आहे. सावडाव धबधब्याकडे जाणारा स्वागत कमानी ते धबधबा रस्ता मुख्यामंत्री सडक योजनेतून मंजूर झाला असून काही तांत्रिक अडचणीमुळे हे काम पूर्णत्वास गेलेले नाही. यामुळे थोडाफार सध्या सावडाव धबधब्याकडे जाताना खड्डेमय रस्यातूनच प्रवास करावा लागतो. ग्रामपंचायत स्तरावरुन सावडाव परीसरात रंगरंगोटी, नळपाणी योजना, स्वच्छता अशा प्रकारची काम सुरू आहेत. पर्यटकांना सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्नशील आहेत. मात्र पर्यटन सिंधुदुर्ग जिल्ह्यात शासनाने सावडावकडे विशेष लक्ष दिल्यास पर्यटकांची लक्षणीय वाढ होईल.

संपूर्ण परिसर पाहण्यासाठी मोठया संख्येने सुरक्षित समजल्या जाणाऱ्या या धबधब्यावर पुरूष, महिला, आबालवृद्ध व लहान मुले पर्यटनासाठी हजेरी लावतात. उंच बांधण्यात आलेल्या मोठया मनो-यावरून मनमोहक दृष्य पाहण्याचा मोठा आनंद घेण्यासाठी पर्यटकांच्या गर्दीत वाढ होत आहे. वर्षा सहलींसाठी धबधब्यावर आनंद लुटण्यासाठी येणा-या पर्यटक व तरुणाईच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे. या धबधब्याचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांची पाऊले मोठय़ा संख्येने सावडावच्या दिशेन वळू लागली. रविवारी सुट्टीच्या दिवशी याठिकाणी झुंबड उडालेली असताना सध्या दरदिवशी गर्दी उसळत आहे. 

Image may contain: plant, outdoor, nature and water

मुंबई गोवा महामार्गापासून केवळ चार किलोमीटर अंतरावर सावडाव धबधबा असून या ठिकाणी उंचावरून कोसळणारे फेसाळ पाणी त्यामधून नकळत अंगावर उडणारे पाण्याचे तुषार, येथील निसर्गसौदर्य यांचा आनंद लुटण्यासाठी सुट्टीच्या दिवशी पर्यटक गर्दी करतात. धबधब्याखाली मनसोक्त अंघोळ करून पर्यटक जेवणाचा व येथील उभारण्यात आलेल्या स्टॉलचा आस्वाद घेतात. धबधब्यावर मौजमस्ती करण्यासाठी जमा झाल्याचे दिसून आले. निसर्गाच्या सानिध्यात असणाऱ्या या धबधब्यावर यावर्षी गर्द वनराईने नटलेल्या सौंदर्यात आणखीन भर पडली आहे. महिला, मुले व वृद्धांना व्यवस्थित पाण्यापर्यंत पोहचता येते असा हा सावडाव पाझर धबधबा जिल्ह्य़ातील सुरक्षित धबधबा मानला जातो. सुमारे ७० फूट रुंदीचा आणि तेवढ्याच उंचीचा हा धबधबा म्हणजे गर्द हिरव्या झाडाझुडपांतला आनंदाचं उधाणच आहे. प्रवाहाच्या बाजूला एक गुहा आहे. शिवाय प्रवाह कोसळतो तिथला तलावासारखा डोह विस्तीर्ण आहे. धबधब्याखाली आंघोळीचा आनंद लुटता अनेक पर्यटक लुटत असताना सगळयात सुरक्षित असा हा धबधबा असल्याने गर्दी करतात. याचमुळे राज्य व ईतर भागातील कानाकोप-यातून सावडाव धबधब्यावर पर्यटक गर्दी करू लागले आहेत. 

Image may contain: one or more people, outdoor, water and nature

सावडावकडे धबधब्यावर कसे पोहचाल ?

मुंबई गोवा महामार्गावर असणाऱ्या मुख्य कमानी असलेल्या सावडाव फाटयापासून  ६ कि.मी.,नांदगाव तिठ्ठा ओटव फाटय़ाहून ९ कि.मी अंतरावर असणारा डोंगरपठारावरुन वाहणारा पाण्याचा प्रवाह अचानक पसरट कड्यावरुन खाली कोसळतो. कणकवली एस.टी.बसस्थानकावरून सकाळी ८.३० दुपारी १.०० ,सायं ५.०० वा.बस सुटते तर कणकवली रेल्वे स्थानकपासून १४  कि.मी. नांदगाव वरून १५ कि.मी. ईतके अंतर आहे. जवळील विमानतळ दाभोळी गोवा येथे आहे. 

धबधबा परीसरात वॉर्टरपार्क संकल्पना राबविल्यास पर्यटनात वाढ

सावडाव धबधबा हा फक्त पावसाळी पर्यटनासाठी प्रसिध्द आहे. मात्र या ठिकाणी बारमाही पर्यटन केंद्र म्हणून जर उदयास यायचे असल्यास या परीसरात जर कोल्हापूर, मुंबई, पुणे या भागात अदयावयात वॉर्टरपार्क उभारल्यास पर्यटकांची पाऊले पावसाळयाप्रामणे ईतर दिवशीही वळतील. यामुळे पर्यटकांची वाढ होवून याचा फायदा सावडाव परीसराचा विकास व रोजगाराभिमूख् संधी निर्माण होतील, तसेच शासनाच महसूलातही तितकाच भर पडेल यासाठी महाराष्ट्र शासन,पर्यटन विकास महामंडळाने लक्ष वेधण्याची गरज आहे

Image may contain: one or more people, outdoor and nature