होमपेज › Konkan › वेंगुर्लेत मे-२०१८ मध्ये आंतरराष्ट्रीय आंबा परिषद

वेंगुर्लेत मे-२०१८ मध्ये आंतरराष्ट्रीय आंबा परिषद

Published On: Nov 15 2017 1:48AM | Last Updated: Nov 14 2017 11:40PM

बुकमार्क करा

वेंगुर्ले : शहर वार्ताहर

डॉ. बाळासाहेब कोकण कृषी विद्यापीठ, दापोली आणि इंटरडिसीप्लिनरी  सोसायटी फॉर अ‍ॅडव्हान्समेंट ऑफ अ‍ॅग्रीकल्चरल सायन्सेस अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी यांच्या संयुक्त विद्यमाने प्रादेशिक फळ संशोधन केंद्र, वेंगुर्ले येथे 8 ते 10 मे 2018 या कालावधीत आंतरराष्ट्रीय आंबा परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. 

आंबा पिकाबाबत आंतरराष्ट्रीय स्तरावरील परिषद प्रथमच सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रादेशिक फळ संशोधन केंद्र, वेंगुर्ले येथे  होत आहे. या परिषदेमध्ये 15 ते 20 देशातील ख्यातनाम शास्त्रज्ञ आपला संशोधनात्मक प्रबंध सादर करणार आहेत. तसेच देशांतर्गत आंबा पिकांवर संशोधन करणारे किमान 300 शास्त्रज्ञ या परिषदेत सहभागी होणार आहेत. याचा फायदा कोकणातील आंबा बागायतदारांना होणार आहे.