होमपेज › Konkan › अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार

अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार

Published On: May 04 2019 12:17PM | Last Updated: May 04 2019 12:27PM
देवरूख : प्रतिनिधी

मुंबई-गोवा महामार्गावरील तुरळ या ठिकाणी अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू झाला. शुक्रवारी (ता.३) रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. वन्यप्राण्यांचा असा मृत्यू होणे ही आता चिंतेची बाब होवू लागली आहे. 

आज (ता.४) शनिवारी सकाळी याबाबतची माहिती वनविभागाला मिळाली. माहिती मिळताच संगमेश्वर तालुक्याचे वनपाल सुरेश उपरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. यावेळी वन अधिकाऱ्यांना चार वर्षांचा पूर्ण वाढीचा बिबट्या वाहनाच्या धडकेमुळे मृत झाल्याचे दिसून आले. या घटनेचा पंचनामा करण्यात आला. या बिबट्याचे शवविच्छेदन देखील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून करून घेण्यात आले. यानंतर मृत बिबट्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.