Thu, May 28, 2020 13:48होमपेज › Konkan › जगबुडी नदीने गाठली धोक्याची पातळी; मुंबई -गोवा महामार्गावरील वाहतूक बंद 

जगबुडी नदीने गाठली धोक्याची पातळी

Published On: Jul 12 2019 8:45AM | Last Updated: Jul 12 2019 1:44PM
रत्नागिरी : प्रतिनिधी

कोकणसह परिसरात पाऊस काही केल्या विश्रांती घेण्याचे नाव घेत नाही. गेल्या आठवड्यापासून पावसाने धुवाँधार कोसळणे सुरूच ठेवले आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. यातच मुंबई-गोवा महामार्गावरील खेड येथील जगबुडी नदीने धोक्याची पातळी गाठली. यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे.

मुंबई-गोवा महामार्गावरील खेड येथील जगबुडी नदी पात्रातील पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. आज, शुक्रवारी (दि.१२) सकाळी जगबुडी नदीने धोक्याची पातळी गाठली. यामुळे सकाळी ७ वाजल्यापासून मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतुक बंद करण्यात आली. या मार्गावरील वाहतूक बंद केल्याने मुंबई-गोवा महामार्ग ठप्प झाला. या आठवड्यात महामार्ग बंद होण्याची ही तिसरी घटना आहे. खबरदारी म्हणून ब्रिटिश कालीन पुलावरील वाहतूक देखील बंद करण्यात आली आहे.