Fri, Sep 20, 2019 21:28होमपेज › Konkan › डिंगणे गावात पुन्हा मृत माकड सापडले

डिंगणे गावात पुन्हा मृत माकड सापडले

Published On: Feb 24 2019 12:01AM | Last Updated: Feb 24 2019 12:01AM
बांदा : वार्ताहर 

डिंगणेत मृत माकड मिळण्याचे सत्र चालू असतानाच  पुन्हा शनिवारी उपसरपंच जयेश सावंत यांच्या काजू बागायतीत पुन्हा मृत माकड सापडल्याने गावात भीतीचे  वातावरण निर्माण झाले आहे. आतापर्यंत नऊ माकडे मृतावस्थेत आढळूनही प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने ग्रामस्थांमधून तीव्र नाराजी व्यक्‍त केली जात आहे.

गेल्या काही दिवसांत गावात नऊ माकडे मृतावस्थेत सापडली; तर गेल्या दोन दिवसांत पाच माकडे मृतावस्थेत आढळली. शनिवारी दुपारी उपसरपंच जयेश सावंत आपल्या बागायतीत काजू गोळा करण्यासाठी गेले असता माकड मृतावस्थेत आढळले. जयेश सावंत यांनी तेथीलच विजय सावंत यांच्या मदतीने मृत माकडाची विल्हेवाट लावली. गावात मृत माकडे सापडण्याचे सत्र सुरूच आहे.