Mon, Sep 16, 2019 11:35होमपेज › Konkan › मतदान केंद्रेंवर राहणार इलेक्ट्रॉनिक वॉच

मतदान केंद्रेंवर राहणार इलेक्ट्रॉनिक वॉच

Published On: Apr 11 2019 2:04AM | Last Updated: Apr 10 2019 10:34PM
रत्नागिरी : प्रतिनिधी

लोकसभा निवडणुकीसाठी 1730 मतदान केंद्रापैकी 175 मतदान  केंद्रांचा परिसर इलेक्ट्रॉनिक देखरेखीखाली आणण्यात येणार  आहे.  यंत्रणेद्वारे काटेकोरपणे कार्यवाही व्हावी व वेळोवेळी सर्व विभागांच्या संपर्कात राहण्याच्या सूचना जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिल्या आहेत. 

जिल्हाधिकारी कार्यालय येथे बुधवारी मतदान यंत्रे आणि व्हीव्हीपॅट  यंत्रांची दुसरी सरमिसळ झाल्यानंतर  निवडणुकयंत्रणेच जिल्हाधिकार्‍यांनी आढावा घेतला. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार लोकसभा मतदरा संघाच्या एकूण मतदान केंद्रापैकी 10 टक्के मतदान केंद्रे इलेक्ट्रॉनिक देखरेखीखाली ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.

निवडणूक केंद्राच्या परिसरातील सर्व हालचालीवर निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयासह सहायक निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयातून यावर नियंत्रण आणि वॉच राहणार आहे. मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाशीही ही यंत्रणा जोडण्यात आली आहे.   लोकसभानिवडणुका निर्विघ्न आणि मोकळ्या वातावरणात पार पडता कोणताही गैरप्रकार घडू नयेत, या हेतूने ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे.