Sat, Sep 21, 2019 07:20होमपेज › Konkan › कोकण पदवीधर मतदारसंघ निवडणूक कार्यक्रम जाहीर

कोकण पदवीधर मतदारसंघ निवडणूक कार्यक्रम जाहीर

Published On: May 29 2018 1:37AM | Last Updated: May 28 2018 8:52PMसिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी

महाराष्ट्र विधान परिषदेच्या कोकण विभाग पदवीधर मतदारसंघातील सदस्य निरंजन डावखरे यांची मुदत 7 जुलै 2018 रोजी संपणार आहे.या जागेसाठी भारत निवडणूक आयोगाकडील 24 मे 2018 च्या आदेशान्वये पुढीलप्रमाणे निवडणूक कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे. 

निवडणुकीची अधिसूचना गुरुवार 31 मे 2018 रोजी प्रसिद्ध होणार आहे. नामनिर्देशन पत्र सादर करण्याची अंतिम दिनांक आहे गुरुवार 7 जून, तर शुक्रवार 8 जून रोजी नामनिर्देशनपत्रांची छाननी होणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख सोमवार 11 जून 2018 अशी आहे. सोमवार 25 जून रोजी सकाळी 8 ते दुपारी 4 या वेळेत मतदान होईल तर मतमोजणी गुरुवार 28 जून रोजी होणार आहे. सोमवार 2 जुलै रोजीपर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे.

भारत निवडणूक आयोगाच्या सूचनांनुसार  उमेदवार व राजकीय पक्षांसाठीची आदर्श आचारसंहिता 24 मे ते निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंतच्या म्हणजेच 2 जुलैपर्यंतच्या कालावधीसाठी संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याकरिता लागू राहील, असे डॉ. दिलीप पांढरपट्टे, जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी, सिंधुदुर्ग हे कळवितात.