Wed, Jun 26, 2019 01:05होमपेज › Konkan › पोलिसाकडून चाकूहल्ला

पोलिसाकडून चाकूहल्ला

Published On: Mar 22 2019 1:52AM | Last Updated: Mar 22 2019 1:52AM
रत्नागिरी : विशेष प्रतिनिधी

शहरातील डीएसपी बंगल्याजवळच्या पोलिस वसाहतीत होळी पौर्णिमेच्या मध्यरात्री ढोल-ताशे वाजवले जात होते. यातून झोपमोड झालेल्या एका पोलिसाने संतप्त होऊन होळी पौर्णिमेच्या कार्यक्रमात रंगलेल्या तिघांवर चाकूने वार केले. महेश शंकर मिलके असे या पोलिसाचे नाव असून त्याच्याविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 

जखमीतील दोघे पोलिस वसाहतीत राहणारे असून एकजण शिवाजीनगर येथे राहणारा आहे.पोलिसांनी केलेल्या चाकूहल्ल्यात पोलिस वसाहतीतील प्रशांत रघुनाथ यादव (46), अनुराग राजेंद्र माने (28) आणि शिवाजीनगर येथील प्रशांत प्रकाश मोरे (36) जखमी झाले. बुधवारी मध्यरात्रीनंतर ही घटना घडली आहे. जखमींना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. 

गुरुवारी दुपारी या सार्वांना रुग्णालयात डिस्चार्ज देण्यात आला. दरम्यान, आरोपी महेश मिलकेला उपचारांसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिस वसाहतीत राहणारा आरोपी महेश मिलके रात्री 2.30 च्या सुमारास होळी जाळण्याच्या ठिकाणी आला. त्याने ढोल-ताशे वाजवू नका. असे सांगितले यातून होळीजवळील तरुण आणि त्याच्यात बाचा-बाची झाली. या रागातून आरोपीने घरातून चाकू आणून प्रशांत मोरे याच्यावर वार केले. सोडवण्यासाठी आलेल्या अनुराग माने व प्रशांत यादव यांच्यावरही वार केले. शहर पोलिस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.