Sat, Sep 21, 2019 06:52होमपेज › Konkan › आंगणेवाडी येथे आज उसळणार भक्‍तीचा महासागर!

आंगणेवाडी येथे आज उसळणार भक्‍तीचा महासागर!

Published On: Feb 25 2019 12:58AM | Last Updated: Feb 25 2019 12:58AM
मसुरे : संतोष अपराज / सुरेश घाडीगावकर

दक्षिण कोकणची काशी म्हणून ओळखल्या जाणार्‍या आंगणेवाडी भराडी देवीच्या यात्रोत्सवाची तयारी पूर्ण झाली आहे. सोमवारी पहाटे 3  वाजल्यापासून यात्रेस सुरुवात होणार आहे. देवीच्या दर्शनासाठी येणार्‍या भाविकांच्या स्वागतासाठी  आंगणेवाडीनगरी  सजली  आहे. 

भक्‍तांंना सुलभ दर्शन होण्यासाठी आठ रांगा तर जादा दोन रांगा अशा दहा रांगांनी भाविकांना देवीचे  सुलभ दर्शन होणार आहे. सुमारे सात ते आठ लाख भाविक यात्रोत्सवात उपस्थिती दर्शवतील, असा अंदाज आहे. यात्रेची उच्चांकी गर्दी लक्षात घेऊन आंगणेवाडी ग्रामस्थ, महसूल, महावितरण, पोलिस प्रशासन,आरोग्य यंत्रणा सज्ज झाली झाली आहे. विविध प्रकारची दुकाने, स्वागत कमानी विद्युत रोषणाईने आंगणेवाडी सजली आहे. भाविकांसाठी देवीच्या दर्शनाबरोबरच  विविध राजकीय पक्ष, सामाजिक संस्थांची शिबिरे, कबड्डी स्पर्धा, शूटिंग बॉल स्पर्धा यासह अन्य करमणुकीचे कार्यक्रम होणार आहेत.