Tue, Sep 17, 2019 04:13होमपेज › Kolhapur › ‘कोल्हापूर दक्षिण’मधूनच लढणार : सतेज पाटील

‘कोल्हापूर दक्षिण’मधूनच लढणार : सतेज पाटील

Published On: May 03 2019 2:02AM | Last Updated: May 03 2019 1:33AM
कोल्हापूर : प्रतिनिधी

जिल्ह्यातील सात जागांची मागणी प्रदेशकडे करण्यात येईल. ‘कोल्हापूर दक्षिण’मधून निवडणूक लढविण्याचे यापूर्वीच ठरले आहे. त्यामध्ये बदल नाही, असे आ. सतेज पाटील यांनी गुरुवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

आ. पाटील म्हणाले, काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांच्याशी आपण चर्चा केली आहे. लोकसभा निवडणुकीचा निकाल लागण्यापूर्वी राज्यातील सर्व जिल्ह्यांतील प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठका होणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने नियोजन करणे आवश्यक आहे. त्यामुळे लवकरच या बैठका सुरू होतील. कोल्हापुरात जसं आमचं ठरलंय त्याप्रमाणे राज्यातही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ठरले आहे. आमची आघाडी आहेच. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी झाल्यापासून कोल्हापुरातील सहा विधानसभा मतदारसंघ काँग्रेसकडे आहेत. त्यामध्ये करवीर, कोल्हापूर दक्षिण, इचलकरंजी, हातकणंगले, शिरोळ आणि कोल्हापूर उत्तर यांचा समावेश आहे. यावर्षी आणखी एक जादा वाढण्याची शक्यता आहे. राधानगरी-भुदरगड हा मतदारसंघही काँग्रेसला मागण्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाबाबत काही चर्चा होऊ तेथून आपणच लढणार. यापूर्वीच आपण हे जाहीर केले आहे. त्यामध्ये कोणताही बदल होणार नाही.

ऋतुराज पाटील यांच्या शिवसेना प्रवेशाबाबतच्या चर्चेमध्ये काही तथ्य नसल्याचे सांगून ‘गोकुळ’वरील लक्ष इतरत्र वळविण्यासाठी विरोधकांचा हा प्रयत्न असल्याचे आ. पाटील यांनी एका प्रश्‍नाला उत्तर देताना सांगितले. 

WhatsApp वर बातम्या मिळवण्याकरीता ८८०५००७७२२ हा नंबर तुमच्या मोबईलमध्ये पुढारी या नावाने सेव्ह करा आणि खालील लिंकवर क्लिक करून WhatsApp ग्रुप जॅाईन करा.
https://chat.whatsapp.com/DmOJLDvGACrHCXh0bqURex