Sun, May 31, 2020 21:57होमपेज › Kolhapur › आजरा : श्रृंगारवाडीत नवे दोन कोरोनाग्रस्त; तालुक्यातील रुग्ण संख्या १५

आजरा : श्रृंगारवाडीत नवे दोन कोरोनाग्रस्त; तालुक्यातील रुग्ण संख्या १५

Last Updated: May 23 2020 6:10PM

file photoआजरा (जि. कोल्हापूर) : पुढारी वृत्तसेवा

आजरा तालुक्यातील श्रृंगारवाडी येथे शनिवारी नव्याने पुन्हा दोन रुग्ण सापडले. यापुर्वी एकजण पॉझिटिव्ह सापडला होता. त्यामुळे आता श्रृंगारवाडी येथे कोरोनाबाधितांची संख्या ३ तर तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या १५ झाली आहे. यापुर्वीच तालुका प्रशासनाने श्रृंगारवाडी गावच्या चारही सीमा बंद केल्या आहेत.

श्रृंगारवाडी येथे दि. १९ रोजी मुंबई वरून प्रवास केलेला एकजण पॉझिटिव्ह आढळून आला होता. त्याच्या संपर्कातील चौघांचा स्वॅब तपासणीकरिता घेण्यात आला होता. शनिवारी एक बालक व युवतीचा अहवाल प्राप्त झाला असून तो पॉझिटिव्ह आला आहे. बालक व युवती हे दोघेही कोविड सेंटरमध्ये क्वारंटाईन आहेत. नव्याने दोन रुग्ण आढळल्याने श्रृंगारवाडी ग्रामस्थांची भिती आणखीन वाढली असून तालुका प्रशासनाकडून खबरदारीचे आवाहन करण्यात आले आहे. तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या १५ झाली असून हारुर, बोलकेवाडी, हालेवाडी, श्रृंगारवाडी, भादवण, बेलेवाडी हु॥, झुलपेवाडी, किणे आदी गावांच्या सीमा बंदच करण्यात आल्या आहेत.