Fri, Feb 22, 2019 14:37होमपेज › Kolhapur › दोघा सख्ख्या भावांचे एकाच दिवशी निधन

दोघा सख्ख्या भावांचे एकाच दिवशी निधन

Published On: Aug 11 2018 1:20AM | Last Updated: Aug 12 2018 1:01AMकसबा बावडा : वार्ताहर

रणदिवे गल्लीतील दोन सख्ख्या भावांचे शुक्रवारी एकाच दिवशी निधन झाले. पांडुरंग धोेंडिराम पाटील (वय 82) व त्यांचे मोठे भाऊ शामराव धोंडिराम पाटील (वय 89) यांचे काही वेळाच्या अंतराने निधन झाले. एकाच दिवशी दोन सख्ख्या भावांचे निधन झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पांडुरंग हे मुलीकडे रहात होते, त्यांचे सकाळी आठ वाजता निधन झाले. त्यांच्यावर अंत्यसंस्कार करून कुटुंबीय घरी परतले. त्यानंतर सायंकाळी त्यांचे बंधू शामराव यांचे निधन झाले. शामराव हे निवृत्त शिक्षक होते. त्यांच्यावर खासगी दवाखान्यात उपचार सुरू होते. उपचार सुरू असताना त्यांचे निधन झाले.