कोल्हापूर : प्रतिनिधी
पन्हाळगडावरून शिवज्योत घेवून परतत असताना झालेल्या दुचाकीच्या अपघातात संग्राम शिवाजी पाटील (वय २३, रा. जाफळे,) ठार झाला. मंगळवारी सकाळी पन्हाळा येथून मित्रांसोबत शिवज्योत घेऊन गावी निघाला होता.
पिंपळे तर्फे सातवेनजीक दुचाकीवरचा ताबा सुटून तो रस्त्याकडेला असणार्या झाडाला धडकला. यामध्ये पाठीमागे बसलेला रोहन संभाजी मोहरेकर (१२) किरकोळ जखमी झाला.