Fri, Jan 24, 2020 16:45होमपेज › Kolhapur › पुढारी रिलीफ फाऊंडेशन; पूरग्रस्तांच्या मदतीसाठी आवाहन

पुढारी रिलीफ फाऊंडेशन; पूरग्रस्तांच्या मदतीसाठी आवाहन

Published On: Aug 09 2019 11:33PM | Last Updated: Aug 14 2019 11:23AM
 मुख्य संपादक, दै. ‘पुढारी’

कोल्हापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यांत आभाळ फाटले आहे. त्यातच अलमट्टी  धरणामुळे पाणी निचरा होत नाही. अस्मानी आपत्तीने हजारो कुटुंबीयांवर भीषण संकट कोसळले आहे. कोल्हापूर, सांगली शहर गेल्या आठवड्यापासून महापुराच्या मगरमिठीत आहे. माणसे मृत्युमुखी पडली आहेत, शेकडो जनावरे मृत्यूच्या विळख्यात आहेत. पाणी नाही, वीज नाही, पेट्रोल-डिझेल नाही, गॅस नाही, भाजीपाला नाही अशी बिकट अवस्था  पूरग्रस्त जनतेची झाली आहे. 

यापूर्वी जेव्हा जेव्हा नैसर्गिक आपत्ती आली, तेव्हा तेव्हा ‘पुढारी’ने स्वतःचा निधी देऊन जनतेकडून मदतनिधी उभारून आपद्ग्रस्तांना मदत केली आहे. 1989 आणि 2005 चा महापूर, 1993 चा किल्‍लारी भूकंप, गुजरातमधील भूकंप अशा नैसर्गिक आपत्तीवेळी ‘पुढारी’ने भरीव निधी उभारला होता. कारगिलवर आक्रमण झाले, तेव्हा ‘पुढारी’ने अडीच कोटींचा निधी जमा केला. त्यातून सियाचीन येथे अत्याधुनिक हॉस्पिटल उभे केले. या हॉस्पिटलने जवानांना संजीवनीच मिळाली. 

नैसर्गिक आपत्तीबरोबर राष्ट्रावरील संकटावेळी ‘पुढारी’ने नेहमीच मदतनिधी उभारून सामाजिक बांधिलकी जपली आहे. याच उद्देशातून ‘पुढारी रिलीफ फाऊंडेशन’ उभारण्यात येत आहे. ‘पुढारी’ने स्वतःचे 51 लाख रु. या रिलीफ फंडात जमा करून हा रिलीफ फंड उभा करण्याचा निर्णय घेतला आहे.

या पार्श्‍वभूमीवर सध्या उद्भवलेल्या महापुराच्या भीषण आपत्तीत पूरग्रस्तांच्या सहाय्यासाठी  ‘पुढारी रिलीफ फाऊंडेशन’ उभारण्यात येत आहे. यापूर्वी जेव्हा ‘पुढारी’ने वेगवेगळ्या आपत्तीवेळी मदतनिधी उभारला तेव्हा तेव्हा सर्वसामान्य जनतेतून आणि समाजाच्या सर्व थरातून, सर्व क्षेत्रांतून निधीसाठी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. याहीवेळी पूरग्रस्त बांधवांच्या मदतीसाठी हजारो हात पुढे यावेत, असे आमचे नम्र आवाहन आहे. 

आपला निधी ‘पुढारी’च्या मुख्य कार्यालयासह सर्व जिल्हा व विभागीय कार्यालयांत सकाळी 11 ते सायंकाळी 5 या वेळेत स्वीकारण्यात येईल. चेक अथवा डिमांड ड्राफ्ट ‘पुढारी रिलीफ फाऊंडेशन’ या नावाने काढण्यात  यावेत. मदतनिधीची पावती देण्यात येईल. 100 रु. पेक्षा अधिक रक्‍कम देणार्‍यांची नावे दररोज दै. ‘पुढारी’तून प्रसिद्ध करण्यात येतील.

बँक अकाऊंट तपशील

Account Name - " PUDHARI RELIEF FOUNDATION "
 

BRANCH ADDRESS  CURRENT ACCOUNT NUMBER       IFSC CODE                SWIFT  CODE   
 

SARASWAT COOPERATIVE  BANK LTD.,

MAHAPALIKA BRANCH,
2127, C' WARD,
BHAUSINGAJI ROAD,
NEAR MAHAPALIKA,
KOLHAPUR PIN-416002,
MAHARASHTRA

 306100100039346   SRCB0000306 

 SRCBINBBKOL

ICICI BANK LTD.,  

RAJARAMPURI
BRANCH, VASANT
PLAZA , BAGAL CHOWK,
KOLHAPUR-416001 ,
MAHARASHTRA. 

 016605501053    ICICI0000166  ICICINBBCTS

IDBI BANK LTD,

SHIVAJI CHOWK BRANCH,
463, KOLHAPUR-416002,
MAHARASHTRA 
 

 0463102000020022  IBKL0000463

 IBKLINBBSCK

खालील ठिकाणी मदतनिधी स्वीकारण्यात येईल.

मुख्य कार्यालय:  पुढारी भवन, 2318 सी, भाऊसिंगजी रोड, कोल्हापूर. दूरध्वनी : 2543111/12/14, 0231-6659999.  Email: news.kop@pudhari.co.in  इचलकरंजी कार्यालय: पुढारी भवन, काँग्रेस कमिटीजवळ, हवामहल बंगला रोड, इचलकरंजी. दूरध्वनी : 0230-2422687    जयसिंगपूर कार्यालय :  दानोळे बिल्डिंग, 11 वी गल्‍ली, डॉ. आवळेकर जवळ, डेबॉन्स कॉर्नर, फोन : 0232-2226960.   गडहिंग्लज कार्यालय : मोरे बिल्डिंग, आजरा- संकेश्‍वर रोड, गडहिंग्लज, दूरध्वनी: 02327-222944.   मुदाळतिट्टा कार्यालय: फराकटे कॉम्प्लेक्स, मुदाळतिट्टा, फोन : 02325-254415.   सांगली कार्यालय : पुढारी भवन, जिल्हा परिषदेसमोर, सांगली-मिरज रोड, सांगली. फोन: 0233-6629928. सातारा कार्यालय: पुढारी भवन, दुर्गापेठ, पोलिस करमणूक केंद्रासमोर, दत्त मंदिरशेजारी, सातारा. फोन: 02162  661901, पुढारी भवन लाहोटी प्लाझा, पोपटभाई पेट्रोल पंपासमोर, शनिवार पेठ कराड 02164 -222392.