Mon, Nov 20, 2017 17:23होमपेज › Kolhapur › कोल्हापूरः ब्लेडने वार करत कैद्याचा आत्महत्येचा प्रयत्न

कोल्हापूरः ब्लेडने वार करत कैद्याचा आत्महत्येचा प्रयत्न

Published On: Nov 15 2017 12:53PM | Last Updated: Nov 15 2017 12:53PM

बुकमार्क करा

कोल्हापूरः प्रतिनिधी

येथील कळंबा कारागृहाच शिक्षा भोगत असलेल्या एका कैद्याने स्व:तावर ब्लेडने वार करत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. गणेश पोपट शिंदे (वय २८) असे त्याचे नाव आहे.

कारागृहातील बरॅक दोनमधील ५ नंबरच्या शौचालयात पडलेल्या ब्लेडने त्याने वार करून घेतले. हात, पाय आणि पोटावर असे एकूण त्याने १० वार केल्याचे दिसून येत होते. खुनाच्या गुन्ह्यात तो २०१४ पासून कारागृहात शिक्षा भोगत आहे. यापूर्वीही एकदा त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला होता. आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करणार असल्याचे कारागृह अधीक्षक शरद शेळके यांनी सांगितले.