Fri, Jan 24, 2020 05:56
    ब्रेकिंग    होमपेज › Kolhapur › कोल्हापूरः शिवाजी पुलावरून मिनी बस पंचगगा नदीत कोसळली, पुण्यातील १३ ठार

कोल्हापूरः शिवाजी पुलावरून मिनी बस पंचगगा नदीत कोसळली, पुण्यातील १३ ठार

Published On: Jan 27 2018 12:52AM | Last Updated: Jan 27 2018 12:02PMकोल्हापूरः प्रतिनिधी

पंचगगा नदीवरील शिवाजी पुलावरून शुक्रवारी रात्री मिनी बस (एमएच १२ एनएक्‍स ८५५०) पूलाचा कटडा तोडून नदीत कोसळली. रात्री साडे अकराच्या सुमारास ही घटना घडली. या अपघातात १३ जण ठार झाल्याचे पोलिसांनी सांगितले. यामध्ये महिलांचाही समावेश आहे. आज (शनिवार २७ जानेवारी) सकाळी सात वाजता एका बालकाचा मृतदेह मिळाला आहे. वाहन चालकाचा ताबा सुटल्याने हा अपघात झाला.

वाचा: नवस फेडायला गेले आणि संपूर्ण कुटुंबचे संपले (Video)

पुणे बालेवाडी येथील भरत केदारी यांचे कुटुंबिय असल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली आहे. गणपतीपुळेहून दर्शन घेऊन येत असताना कोल्‍हापूरातील पंचगंगा नदीवरील शिवाजी पुलाचा कठडा तोडून मिनी बस नदीत कोसळली. बसमध्ये एकाच कुटुंबातील १६ जणांचा व एक चालक अशा १७ जणांचा समावेश आहे. मदतकार्य सकाळी आठ वाजेपर्यंत सुरू होते. यामध्ये ठार झालेल्यांमध्ये सहा पुरूष, सात महिला असून सोळावर्षाखालील सात मुलींचा समावेश आहे. तीन महिला गंभीर जखमी झाल्या आहेत.

वाचा : कोल्हापूर : भीषण अपघात; स्थानिकांच्या मदतीने बचावकार्य (video)

घटनास्थळी बुधवार पेठेतील स्थानिक लोकांच्या मदतीने सुरूवातीला बचाव कार्य सुरू करण्यात आले होते, २ तासानंतर व्हाईट आर्मीचे जवान घटनास्थळी दाखल झाले होते. या ट्रव्हल्समध्ये १७ जण होते यापैकी ८ जणांना स्थानिक लोकांच्या मदतीने बाहेर काढण्यात आले होते, तर ११ जणांना जलसमाधी मिळाली.

मृत व्यक्ती : संतोष बबनराव वरखडे (वय ४५), गौरी संतोष वरखडे (१६), ज्ञानेश्वरी संतोष वरखडे (१४), सचिन भरत केदारी (३४), निलम सचिन केदारी (२८), संस्कृती सचिन केदारी (८), सानिध्य सचिन केदारी(९महिन), साहिल दिलीप केदारी (१४), भावना दिलीप केदारी (३५), श्रावणी दिलीप केदारी (११), छाया दिनेश नांगरे (४१), प्रतिक दिनेश नांगरे (१४), अज्ञात वाहन चालक (२८),

जखमी व्यक्तींची नावे : प्राजक्ता दिनेश नागरे (१८), मनिषा संतोष वरखडे (३८), मंदा भरत केदारी (५४)

पाहा: पंचगंगा नदीवरील भीषण अपघाताचे Exclusive फोटो