Tue, Jan 22, 2019 08:26होमपेज › Kolhapur › कोल्‍हापूर राधानगरी मार्गावर पेट्रोलचा टँकर पलटी

कोल्‍हापूर राधानगरी मार्गावर पेट्रोलचा टँकर पलटी

Published On: May 17 2018 8:52PM | Last Updated: May 17 2018 8:52PMकौलव  प्रतिनिधी

कोल्हापूर राधानगरी राज्यमार्गावर घोटवडे (ता.राधानगरी) नजीक पेट्रोलचा भरलेला टँकर पलटी झाला. मात्र कोणतीही जिवित्त हानी झाली नाही.ऊस पिकात सांडणाऱ्या पेट्रोलची मात्र लोकांनी अक्षरशः लयलुट केली.

मिरज येथून धामोडकडे पेट्रोल घेऊन चाललेला टँकर (क्रमांक एम एच 09 सी 3443) हा संध्याकाळी साडे सातच्या सुमारास चव्हाण ओढयानजीक पलटी झाला. या परीसरात पाऊस सुरू होता त्यामुळे टँकर घसरून ऊसाच्या शेतात जाऊन पलटी झाला. केवळ दैव बलवत्तर असल्याने चालक व क्लिनर दोघेही बचावले हे दोघे टँकरच्या वरील बाजूने बाहेर पडले.

टँकर पलटी झाल्याचे समजताच आसपासच्या तरूणांनी घटनास्थळी धाव घेतली. टँकरमधून ऊसाच्या शेतात पेट्रोल सांडत होते. टँकरमधून बाहेर  पडणारे पेट्रोल भरून नेण्यासाठी लोकांची अक्षरशः झुंबड उडाली होती. लोकांनी विशेषतः तरूणानी बादली,घागरी,कॅन,किटलीसह मिळेल त्या भांडयाने पेट्रोल नेण्यासाठी अक्षरशः लयलुटच केली.