Mon, Sep 16, 2019 05:29होमपेज › Kolhapur › बजेटवरून कारभारी-नगरसेवकांत दोन गट

बजेटवरून कारभारी-नगरसेवकांत दोन गट

Published On: May 20 2018 1:42AM | Last Updated: May 20 2018 12:34AMकोल्हापूर महापालिकेचे बजेट (अंदाजपत्रक) करण्यात आले. स्थायी समिती आणि नंतर महासभेतही त्याला मंजुरी मिळाली. परंतु, अद्यापही बजेटवर महापौर म्हणून स्वाती यवलुजे यांची स्वाक्षरी झालेली नाही. सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादीसह विरोधी भाजप-ताराराणी आघाडीच्या कारभार्‍यांनी बजेटमध्ये स्वतःसह मर्जीतील नगरसेवकांना जास्तीचा निधी दिला असल्याची चर्चा आहे. त्यावरून कारभारी व नगरसेवकांत दोन गट पडल्याचे सांगण्यात येते. त्याचा परिणाम महापौर निवडणुकीवर होण्याची शक्यताही वर्तविली जात आहे. 

बजेट सादर करतानाच स्थायी सभापती आशिष ढवळे यांच्याकडून तोंडे पाहून निधी दिला असल्याचा आरोप होत होता. त्यानंतर महासभेत बजेट मंजूर करताना उपसूचना दाखल करण्यात आली. त्यानुसार सर्वांना समान निधी असे सूत्र तयार केले जात असल्याची चर्चा नगरसेवकांत होती. परंतु, याठिकाणीही कारभार्‍यांनी आपापल्या भागात कोट्यवधींचा निधी घेतला असल्याचा आरोप केला जात आहे. तसेच ठराविक नगरसेवकांनाही मोठ्या प्रमाणात निधी दिला असल्याचे सांगण्यात येते. त्यावरून नगरसेवकांत नाराजी असल्याची चर्चा आहे. ही नाराजी महापौरपदाच्या निवडणुकीच्या माध्यमातून उमेदवारांविरुद्ध उमटू शकते, असेही सांगितले जात आहे.

पावसाळ्यापूर्वी खड्डे मुजवा : आयुक्‍त

पावसाळ्यापूर्वी कोल्हापूर शहरातील रस्त्यात पडलेले मोठे खड्डे मुजवून घ्यावेत, अशा सूचना महापालिका आयुक्‍त डॉ. अभिजित चौधरी यांनी शनिवारी दिल्या. मान्सून पूर्व तयारीचा आयुक्‍तांनी  महापालिका अधिकार्‍यांकडून आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी सूचना केल्या. 

विभागीय कार्यालय, उद्यान व विद्युत विभागाने पथक तयार करावेत. आवश्यक त्यावेळी अग्निशमन विभागास आवश्यक असणारे कर्मचारी उपलब्ध करून द्यावेत. अधिकार्‍यांनी एकमेकांशी समन्वय ठेऊन आपत्तकालीन परिस्थितीमध्ये कार्यरत राहावे. स्थलांतरित करावयाच्या ठिकाणी सर्व सुविधा उपलब्ध आहेत का तसेच त्यांचे जेवण, पिण्याचे पाणी व ब्लॅरेकेटची व्यवस्था करणेत आली आहे का? ते तपासावे. तसेच पावसाळ्यापूर्वी कार्यशाळा अधीक्षक यांना वर्कशॉपकडील सर्व वाहने व अत्यावश्यक मशिनरीची दुरुस्तीचे काम पूर्ण करून घेणेच्या सूचना दिल्या. ज्या इमारतीच्या बेसमेंटमध्ये पाणी साचून राहते त्यांना दंड आकारून पुढील कारवाई करण्याचे आदेशही  दिले.