होमपेज › Kolhapur › कोल्हापुरात आपलं ठरलंय वाल्यांची गाडी सुसाट, ध्यानातं ठेवलेल्यांची पिछाडी 

कोल्हापुरात आपलं ठरलंय वाल्यांची गाडी सुसाट, ध्यानातं ठेवलेल्यांची पिछाडी 

Published On: May 23 2019 10:28AM | Last Updated: May 23 2019 10:45AM
कोल्हापूर : पुढारी ऑनलाईन 

संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात शिवसेना- भारतीय जनता पक्षाचे उमेदवार संजय मंडलिक यांची गाडी सुसाट गेली आहे. विद्यमान खासदार धनंजय महाडिक जवळपास ६० हजार मतांनी पिछाडीवर आहेत. 

►बंटींची 'आमच ठरलं' भूमिका फायद्याची ठरली : संजय मंडलिक

कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघाचा खासदार कोण? या लोकांच्या उत्कंठेवर गुरुवारी शिक्‍कामोर्तब होणार आहे. दुपारी बारानंतर दोन्ही मतदार संघाचे कौल स्पष्ट व्हायला सुरू होणार आहे. त्यामुळे दुपारपासून उमेदवारांच्या समर्थकांकडून विजयाची रॅली व जल्लोष सुरू होणार आहे. 

कोल्हापूर लोकसभा मतदार संघाचे भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक यांच्या कार्यकर्त्यांनी विजयी मिरवणुकीची तयारी केली आहे, तर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार खा. धनंजय महाडिक हेच जिंकतील, असा त्यांच्या समर्थकांनी दावा केला आहे.    

►LIVE : कोल्हापुरात ७६ हजार मतांनी मंडलिक आघाडीवर

आपलं ठरलंय आणि ध्यानात ठेवलंयचा फैसला

‘आमचं ठरलंय’ म्हणत काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी सगळी रसद शिवसेनेच्या प्रा. मंडलिक यांना पुरवली होती. तर खा. शरद पवार यांनी ‘मीबी ध्यानात ठेवलंय’ असे प्रत्युत्तर ‘आपलं ठरलंय’ या  सोशल मीडियावरील प्रचारतंत्राला दिले होते. त्यामुळे निकालानंतर महाडिक आणि पाटील यांच्या वर्चस्ववादाच्या लढाईच्या एका टप्प्याचा फैसला होणार आहे. यानंतर हा संघर्ष सुरूच राहणार असल्यानेही या निकालाबाबत समर्थकांचे बारीक लक्ष लागले आहे.

►LIVE: हातकणंगलेमधून धैर्यशील माने ११ हजार मतांनी आघाडीवर 

आज सकाळपासून सोशल मीडियावर फक्‍त आणि फक्‍त ‘माझा नेता’, ‘तुझा नेता’, ‘आमचा पक्ष’ आणि ‘तुमचा पक्ष’ अशा चर्चांना ऊत आला होता. फेसबुक व व्हॉट्स अ‍ॅपवर तर उलटसुलट मजकुरांमुळे टीकाटिपणीलाही जोर दिसून आला.