Sun, Apr 21, 2019 06:38होमपेज › Kolhapur › कुरूंदवाडमध्ये जुगार अड्‍ड्‍यावर छापा;  ५५ हजार रूपयांचा मुद्‍देमाल जप्त

कुरूंदवाडमध्ये जुगार अड्‍ड्‍यावर छापा;  ५५ हजार रूपयांचा मुद्‍देमाल जप्त

Published On: Nov 09 2018 8:58PM | Last Updated: Nov 09 2018 8:58PM कुरूंदवाड : प्रतिनिधी

येथील मटन मार्केट पाण्याच्या टाकी लगत सुरू असलेल्या तीन पानी जुगार अड्डय़ावर कुरूंदवाड पोलिसांनी धाड टाकून 18 जणांना ताब्यात घेतले आहे. या धाडीत  39 हजार रुपये रोख रकमेसह जुगाराचे साहित्य असा 55 हजार 140 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

 दरम्यान इचलकरंजीचे पोलिस उपअधीक्षक डॉ.निलभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली चार दिवसात कुरुंदवाड पोलिसांनी जुगार अड्ड्यावरील ही पाचवी मोठी कारवाई केल्याने क्लब चालकांचे धाबे दणाणले आहेत.

आज सायं 6 वा. सुमारास येथील मटन मार्केट पाण्याच्या टाकीजवळ एकता कला क्रीडा मनोरंजन मंडळाच्या नावाखाली पैसे लावून सुरू असलेल्या तीन पानी जुगार अड्ड्यावर कुरूंदवाड पोलिसांनी टाकलेल्या धाडीत 18 जणासह 39 हजार रुपये रोख रक्कम 15 मोबाइल संच, जुगाराचे साहित्यासह 55 हजार 140 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आले आहेत.या कारवाईत पोलिस निरीक्षक चंद्रकांत निरावडे,पलिस उपनिरीक्षक अण्णासाहेब शिंदे,सह पोहेका.अविनाश मुंगशे,हेमंत करोशी,संजय राठोड,सह अदि पथकात सहभागी होते.गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे