Sat, Nov 17, 2018 18:33होमपेज › Kolhapur › कोल्हापूर-गगनबवडा मार्गावर बस अपघात ; एक ठार, तीन गंभीर

कोल्हापूर-गगनबवडा मार्गावर बस अपघात ; एक ठार, तीन गंभीर

Published On: Jul 13 2018 10:14AM | Last Updated: Jul 13 2018 10:20AMकोल्‍हापूर : प्रतिनिधी

कोल्‍हापूर जिल्‍ह्यात विविध ठिकाणी संततधार पाऊस सुरू आहे. आज शुक्रवारी सकाळी पावणे नऊ वाजता कोल्हापूर-गगनबवडा मार्गावर लोंघे महादेव मंदिराच्या वळणावर दोन बस धडकून अपघात झाला.

अपघातात वृध्दा ठार झाली असून तीन गंभीर आहेत. बसची समोरासमोर धडक झाल्याने बसमधील अनेक प्रवासी जखमी झाले आहेत. या अपघातामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. अपघातग्रस्‍त बसमधील प्रवाशांना ग्रामस्थांच्या मदतीने बाहेर काढण्यात आले. जखमींना उपचारासाठी कोल्‍हापूरातील सीपीआर रुग्णालयात पाठविले जात आहे. कोदे बस कोल्हापूरहून कोदेकडे निघाली होती. पुणे-विजदुर्ग एसटी गगनबाड्याकडून कोल्हापूरच्या दिशेने जात होती.