Fri, Feb 22, 2019 14:16होमपेज › Kolhapur › करवीर निवासिनी अंबाबाईची तिसर्‍या दिवशीची पूजा माहेश्वरी रुपात 

करवीर निवासिनी अंबाबाईची तिसर्‍या दिवशीची पूजा माहेश्वरी रुपात 

Published On: Oct 12 2018 7:26PM | Last Updated: Oct 12 2018 7:29PMकोल्‍हापूर : पुढारी ऑनलाईहन 

कोल्‍हापूरच्या अंबाबाईची आज नवरात्रीच्या तिसर्‍या दिवशी करवीर निवासिनी अंबाबाईची तिसर्‍या दिवशीची पूजा माहेश्वरी रुपात पूजा बांधण्यात आली. सभोवताली हिमाच्छादीत शिखरे त्‍यात व्याघ्रचर्म धारण केलेली देवीचे तेजस्‍वी स्‍वरूप असे आजच्या पूजेचे स्‍वरूप आहे.   

महेश्वराची म्‍हणजेच शिवाची शक्‍ती अथवा त्‍यांचे स्‍त्रीरूप. मत्‍स्‍यपुराण, महाभारत, देवीमहात्‍म्‍यामध्ये या देवतेचा उल्‍लेख येतो. मत्‍स्‍यपुराणानुसार शिवाने अंधकासुराच्या नाशासाठी मातृकांची निर्मिती केली. त्‍यातील महेश्वरी ही एक मातृका. देवीमहात्‍म्‍यानुसार महासरस्‍वती अथवा कौशिकीच्या मदतीला शुंभ-निशुंभांच्या विरोधात ज्‍या मातृका निर्माण झाल्‍या त्‍यात महेश्वरीचा उल्‍लेख येतो. शिवाचे स्‍वरूप धारण करणारी शक्‍ती म्‍हणून वृशारूढा- बैलावर आरूढ. जटा हाच मुगुट व्यार्घचर्म धारण करणारी त्रिशुल -डमरू-सर्प आणि अक्षमाला धारण करणारी त्रिनेत्रा मस्‍तकावर चंद्रकोर हीला संध्यावंदनामध्ये सामवेदरूपी सायंगायत्री म्‍हणजेच संध्याकाळच्या सूर्याची देवता मानतात.