होमपेज › Kolhapur › कोल्हापूर : म्हाकवे फाट्यावरील अपघातात केनवडेचा तरूण ठार 

कोल्हापूर : म्हाकवे फाट्यावरील अपघातात केनवडेचा तरूण ठार 

Last Updated: Feb 26 2020 7:22PM
म्हाकवे (जि. कोल्हापूर) : पुढारी वृत्तसेवा 

कागल कापशी मार्गावरील म्हाकवे फाट्यावर झालेल्या अपघातात केनवडेचा तरूण ठार झाला. मोटारसायकलवरील नियंत्रण सुटल्याने गाडी स्लीप होऊन झालेल्या अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाला. तानाजी लक्ष्मण तळेकर असे मयत तरूणाचे नाव आहे. याबाबत पोलिसांत अपघाताची नोंद झाली आहे. 

'राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना भारतरत्न द्या' 

याबाबत मिळालेली माहिती अशी की, केनवडे येथील तानाजी तळेकर हा मोटारसायकलने कागल येथे सासुरवाडी असणाऱ्या सेनापती कापशीला गेला होता. तो आपल्या पत्नीला सोडून गावाकडे येत असताना हा अपघात झाला. म्हाकवे फाट्यावर भरधाव वेगामुळे मोटारसायकलवरील नियंत्रण सुटल्याने बाजूच्या मोरीतून गाडीसह दगडावर जोरात आपटला. त्याच्या डोक्याला जोरदार मार लागल्याने तानाजीचा जागीच मृत्यू झाला.  

राज्यपालांकडे शेतकर्‍यांच्या कर्जमाफीच्या वेदना

अपघाताची गंभीरता बाजूला तुटलेल्या पाईपलाईनवरून लक्षात येते. गाडीचा वेग इतका होता की, पाईपलाईन तोडून गाडी पन्नास फुट पुढे गेली होती. तर मोटारसायकलच्या पुढच्या भागाचा चक्काचूरा झाला होता. मयत तानाजी तळेकर याच्या पश्चात पत्नी व दोन लहान मुली आहेत.