Thu, May 28, 2020 16:50होमपेज › Kolhapur › चाफवडे येथे घराला आग; दीड लाखांचे नुकसान

चाफवडे येथे घराला आग; दीड लाखांचे नुकसान

Published On: May 16 2019 8:52PM | Last Updated: May 16 2019 8:52PM
आजरा : प्रतिनिधी 

चाफवडे (ता. आजरा) येथे घराला लागलेल्या आगीत सुमारे दीड लाखांचे नुकसान झाले आहे. आदर्श वसाहत येथे घडलेल्या या घटनेत संसारोपयोगी साहित्यासह शेतीउपयोगी साहित्याचे नुकसान झाले.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, श्रीमती द्रौपदा लक्ष्मण पाटील, समाधान पाटील, धनाजी पाटील यांच्या संसारोपयोगी साहित्यासह  शेती उपयुक्त साहित्याचे प्रचंड नुकसान झाले आहे. सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही.

 सकाळी द्रौपदा पाटील या काजू बिया गोळा करण्याच्या साठी शेताकडे गेल्या होत्या. दरम्यान ग्रामस्थांना दुपारच्या वेळी घरातून आगीचे लोट येताना दिसले. ग्रामस्थांनी तातडीने पाटील कुटुंबियांच्या घराकडे धाव घेतली व आग विझवण्याचा प्रयत्न केला पण फारसे यश आले नाही. दुपारची वेळ असल्याने आगिवर नियंत्रण ठेवणे अडचणीचे झाले. यामुळे अल्पावधीतच घराचे छप्पर कोसळून सर्व संसारोपयोगी साहित्य व  शेतीउपयोगी साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडले.

नुकसानीचा पंचनामा करण्यात आला असून आगीचे नेमके कारण समजू शकले नाही.