Mon, Sep 16, 2019 05:59होमपेज › Kolhapur › ज्यांच्यासाठी मंत्रीपद पणाला लावले तेच पक्षाच्या विरोधात : मुश्रीफ

ज्यांच्यासाठी मंत्रीपद पणाला लावले तेच पक्षाच्या विरोधात : मुश्रीफ

Published On: Feb 21 2018 1:12AM | Last Updated: Feb 21 2018 1:12AMकसबा सांगाव : वार्ताहर 

राज्य सरकारला भिक मागायला जागा नाही. मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे असणारे सार्वजनिक बांधकाम सारखे दुसर्‍या क्रमांकाचे मंत्रिपद माझ्याकडे असते तर जिल्ह्यातील रस्ते काचेसारखे चकाचक केले असते. यांना राज्य करता येत नाही, राज्य करायला जातीचे लागतात, अशी टीका आ. हसन मुश्रीफ यांनी केली.

कसबा सांगाव (ता.कागल ) येथे हसन मुश्रीफ युवा शक्‍तीच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद भाजप पक्ष प्रतोद विजय भोजे होते. मुश्रीफ पुढे  म्हणाले, भीमा कोरेगाव दंगल, औरंगाबाद उपमहापौराचे छ. शिवाजी महाराजांच्या विषयीचे विधान, कर्ज माफीची कुचेष्ठा यामुळे  सर्वच  घटक सरकारवर नाराज आहेत. खा. धनंजय महाडिक यांना निवडून आणण्यासाठी माझे मंत्रिपद मी पणाला लावले होते.आता त्यांचे पक्षविरोधी काम असह्य  झाले आहे. लोकसभेसाठी प्रा. संजय मंडलिक राष्ट्रवादीत आले तर त्यांना उमेदवारी नाही तर मीच उमेदवार असा पुनरुच्चार देखील त्यांनी केला.

जि.प. सदस्य विजय भोजे म्हणाले, बहुजनांसाठी काम करणारा मुश्रीफ यांच्यासारखा राज्यात दुसरा नेता नाही. त्यांनी भाजपमध्ये यावे. ते मुख्यमंत्री होतील. यावेळी तालुका संघाचे संचालक राजेद्र माने, पी. डी.आवळे, बाजार समितीचे सभापती कृष्णात पाटील, युवा शक्‍तीचे अध्यक्ष संजय हेगडे यांचीही भाषणे झाली. विविध क्षेत्रांतील मान्यवरांचे सत्कार झाले. पं.स. सदस्य राजश्री माने, भैया माने, उमेश माळी, अजित शेटे, विक्रमसिंह माने, सागर चव्हाण आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वागत संतोष आवळे, सूत्रसंचालन किरण घाटगे यांनी केले.