कोल्हापूर : प्रतिनिधी
शहरातील मध्यवर्ती भेंडे गल्लीत गणपती मंदिराचे बांधकाम सुरू असताना भिंत कोसळून दोघे कामगार अडकल्याची घटना सोमवारी दुपारी घडली आहे. अग्निशमन दलाचे जवान तसेच राजवाडा पोलिस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.
दोन्ही कामगारांना बाहेर काढण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरु आहेत.