Sat, Jul 04, 2020 18:19होमपेज › Kolhapur › कोल्हापूरमध्ये आणखी ५ कोरोनाग्रस्तांची भर

कोल्हापूरमध्ये आणखी ५ कोरोनाग्रस्तांची भर

Last Updated: Jun 01 2020 4:55PM

संग्रहित छायाचित्रकोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूरमध्ये आणखी ५ कोरोनाग्रस्तांची भर पडली असून बाधितांची आकडा ६१२ वर पोहोचला आहे. जिल्ह्यात रविवारी कोरोनाचे नवे ४५ रुग्ण आढळून आले. दोघेजण कोरोनामुक्‍त झाल्याने रुग्णालयातून डिस्चार्ज घेतलेल्यांची संख्या १३४ वर गेली आहे.

काल (ता.३१) कडवेपैकी लाळेवाडी (ता. शाहूवाडी) येथील ५५ वर्षीय महिलेचा शनिवारी मृत्यू झाला होता, तिचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यातील कोरोना बळींची संख्या सहा झाली आहे.

दरम्यान, उपचार घेत असलेले दोन पॉझिटिव्ह रुग्ण पळून गेल्याने सीपीआर प्रशासन हादरून गेले आहे. लाळेवाडी येथील ही महिला मुंबईहून आली होती. तिला इन्स्टिट्यूशनल क्‍वारंटाईन करण्यात येणार होते. मात्र, तिच्या पतीने घरी स्वतंत्र व्यवस्था  आहे, असे सांगतिल्याने तिला होम क्‍वारंटाईन करण्यात आले होते.

दि. २५ रोजी तिचा स्वॅब घेण्यात आला होता. दरम्यान, तिला जुलाबाचा त्रास वाढल्याने दि. २७ रोजी सीपीआरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना शनिवारी (दि. ३०) दुपारी तिचा मृत्यू झाला. तिचा अहवाल पॉझिटिव्ह आला.