Wed, Jun 03, 2020 19:02होमपेज › Kolhapur › गोकुळला मल्‍टीस्‍टेट होऊ देणार नाही : चंद्रकांत पाटील 

'म्हणून' महाडिकांच्या गळ्यात राष्ट्रवादीची उमेदवारी : चंद्रकांत पाटील यांचा नवीन 'बॉम्बस्फोट'

Published On: Apr 20 2019 3:35PM | Last Updated: Apr 20 2019 4:43PM
कोल्‍हापूर : प्रतिनिधी 

गोकुळ हा 'प्राण' आहे आणि गोकुळमधील गणित बिघडू नये म्‍हणून धनंजय महाडिक यांना शिवसेनेऐवजी राष्‍ट्रवादीच्या चिन्हावर लढण्याचा सल्‍ला देण्यात आला. इतकेच नव्हे, तर त्‍यांना तिकीट घेण्यासाठी सक्‍ती करण्यात आली, असा गौप्यस्फोट मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला. कोल्‍हापुरात एका प्रचारसभेत बोलताना पाटील यांनी हा गौप्यस्‍फोट केला. 

गोकुळ हा प्राण असल्‍याने धनंजय महाडिक यांनी जर शिवसेनेच्या चिन्हावर निवडणूक लढविली तर, गोकुळ फुटेल हे महाडिकांना माहिती होते. त्‍यामुळे त्‍यांना जाणीव पूर्वक राष्‍ट्रवादीची उमेदवारी घ्‍यायला भाग पाडली, शरद पवारांनी, हसन मुश्रीफ आणि सतेज पाटील यांनी सर्व प्लॅनिंग करून धनंजय महाडीक यांना राष्‍ट्रवादीचे तिकिट घ्‍यायला भाग पाडले. या सर्वांची जाणीव असूनही धनंजय महाडिक काही करू शकत नाहीत, कारण आज जे आहेत ते महादेवराव महाडीक आहेत असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. 

यावेळी बोलताना पाटील म्‍हणाले धनंजय महाडिक यांनी शिवसेनेचे चिन्ह घेतले असते तर सगळेच वणवे झाले असते. कारण धनंजय याच्या राष्‍ट्रवादीकडून निवडणूक लढविल्‍यामुळे संपूर्ण महाडिक कुटुंब डिस्‍टर्ब झाले आहे. यामुळे आमदार अमल महाडिक, शौमिका महाडिक, धनंजय महाडिक हे सर्व डिस्‍टर्ब आहेत. 

पुढे बोलताना पाटील यांनी महाडिक यांनी ज्‍या गोकुळच्या प्रेमापोटी हे सर्व केले. त्‍या गोकुळला मल्‍टीस्‍टेट होऊ देणार नसल्‍याचे सांगितले. तसेच महाराष्‍ट्र शासनाच्या एनओसी शिवाय गोकुळ मल्‍टीस्‍टेट होऊ शकत नाही. इंटेलिजन्स ब्युरोच्या अहवालानुसार  लोकसभा निवडणुकीत कोल्हापूर मतदारसंघात महायुतीचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक ९० हजार मतांनी आघाडीवर असल्याचे महसूल मंत्री चंद्रकांत  पाटील यांनी स्पष्ट केले.  असे असले तरीही यामध्ये चढ-उतार होत आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी गाफील न राहता पून्हा मोदी का हे पटवून देण्यासाठी गेल्या पाच वर्षात मोदी सरकार त्याचबरोबर फडणवीस सरकारने केलेली कामे कार्यकर्त्यांनी सर्वसामान्यांपर्यंत पोहचवावीत, असेही ते म्‍हणाले.