Sun, Jul 05, 2020 12:39होमपेज › Kolhapur › भुदरगड तालुक्याची अर्धशतकाकडे वाटचाल; आज १२ नव्या रुग्णांची भर

भुदरगड तालुक्याची अर्धशतकाकडे वाटचाल; आज १२ नव्या रुग्णांची भर

Last Updated: May 25 2020 1:15PM
गारगोटी :  पुढारी वृत्तसेवा

भुदरगड तालुक्‍यात आज १२ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यामुळे पुन्हा एकदा भुदरगड तालुका हादरून गेला. आज अखेर भुदरगड तालुक्याच्या खात्यावर ४७ रुग्णांची नोंद झाली आहे.

तालुक्यातील लहान बारवे, पळशिवणे, नवले, गिरगाव, देऊळवाडी, वाघापूर या गावात प्रत्येकी एक तर अंतुर्लीत तीन, सुक्याचीवाडी, शिवडाव मध्ये दोन रूग्ण आढळले आहेत. रविवारी अंतुर्ली व चाफेवाडीत प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला होता. प्रांताधिकारी डॉ. संपत खिलारी यांनी या सर्व गावात कटेन्मेंट झोन जाहीर केला आहे.