Thu, Jun 04, 2020 00:35होमपेज › Kolhapur › कोल्हापुरात उद्या पाणीपुरवठा बंद

कोल्हापुरात उद्या पाणीपुरवठा बंद

Last Updated: Oct 10 2019 1:09AM
कोल्हापूर ः प्रतिनिधी
कोल्हापूर शहरातील बहुतांश भागाला पाणीपुरवठा करणार्‍या बालिंगा पंप हाऊसजवळील गळती काढण्याबरोबरच उपसा केंद्रातील पंप दुरुस्तीचे काम शुक्रवारी (दि. 11) करण्यात येणार आहे. परिणामी पंपिंग हाऊस बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे शहरातील ए, बी व संपूर्ण सी, डी वॉर्ड, त्यास संलग्‍नित उपनगरे, ग्रामीण भागातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे. शनिवारी (दि. 12) अपुरा व कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे.

लक्षतीर्थ वसाहतपरिसर, संपूर्ण फुलेवाडी रिंगरोड परिसर, साने गुरुजी वसाहत परिसर, आपटेनगर टाकी परिसर, राजोपाध्येनगर परिसर, कणेरकरनगर परिसर, क्रांतिसिंह नाना पाटील नगर परिसर, तुळजाभवानी कॉलनी परिसर, देवकर पाणंद परिसर, शिवाजी पेठ परिसर, मंगळवार पेठ काही भाग, संपूर्ण सी व डी वॉर्डमधील दुधाळी परिसर, गंगावेस परिसर, उत्तरेश्‍वर पेठ परिसर, शुक्रवार पेठ परिसर, बुधवार पेठ तालीम परिसर, पापाची तिकटी परिसर, लक्ष्मीपुरी परिसर, सोमवार पेठ परिसर, बिंदू चौक परिसर, आझाद चौक परिसर, महालक्ष्मी मंदिर परिसर, मिरजकर तिकटी परिसर आदी ठिकाणचा पाणी पुरवठा बंद राहील. संबंधित भागात दैनंदिन पिण्याचे पाणी टँकरद्वारे पुरविण्यात येणार आहे. नागरिकांनी उपलब्ध पाणी काटकसरीने वापरून सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.