Sat, Jul 04, 2020 18:41होमपेज › Kolhapur › कोल्हापूर : 'त्या' भोंदूंना पोलिसांनी फिरवले परिसरात

कोल्हापूर : 'त्या' भोंदूंना पोलिसांनी फिरवले परिसरात

Last Updated: Jun 03 2020 1:18PM
कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा 

देव-देवता साधुसंतांचा साक्षात संचार होत असल्याची बतावणी करून असहाय्य भाविकांना लुटणाऱ्या दोघा भोंदूंना मंगळवार पेठेतील सिद्धाला गार्डन परिसरातील श्री स्वामी समर्थ सेवा ट्रस्ट परिसरात बुधवारी दुपारी फिरविले.  

भाविकांना गंडा घालून मिळवलेली कोट्यवधीची रक्कम संशयितांनी कुठे लपवली याचा पोलिस शोध घेत आहेत. जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक योगेश पाटील यांनी पोलिस बंदोबस्तात फडणीस आणि सहस्त्रबुद्धे यांना मंगळवार पेठेतील श्रीसमर्थ स्वामी मठात आणले. पोलिसांनी गटातील सर्व खोल्यांची झडती घेत पंधरा मिनिटे ही तपासणी सुरू केली. भोंदूंना पाहण्यासाठी परिसरातील लोकांची एकच गर्दी झाली होती.

भोंदूंची बँक खाती गोठवली

शिवराज्याभिषेक : लोककल्याणकारी राज्याचा उदय..