Wed, Jun 19, 2019 08:59होमपेज › Kolhapur › ‘पुढारी शॉपिंग फेस्टिव्हल’चे आज उद्घाटन

‘पुढारी शॉपिंग फेस्टिव्हल’चे आज उद्घाटन

Published On: Oct 12 2018 1:29AM | Last Updated: Oct 12 2018 1:25AMकोल्हापूर : प्रतिनिधी

मनसोक्त खरेदीसह भरगच्च ऑफर्सची बरसात करणार्‍या ‘पुढारी शॉपिंग फेस्टिव्हल 2018’ ची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. दैनिक ‘पुढारी’तर्फे आयोजित या फेस्टिव्हलला शुक्रवार (दि. 12) पासून प्रारंभ होत आहे.

शुक्रवारी सायंकाळी 4.30 वाजता एस. एस. कम्युनिकेशनच्या डायरेक्टर दीपा शहा व रॉनिक इन्स्टंट वॉटर हीटर सिस्टीमचे तानाजी पवार यांच्या हस्ते आणि दैनिक ‘पुढारी’ कस्तुरी क्लबच्या अध्यक्षा सौ. स्मितादेवी योगेश जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत या प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे.

प्रदर्शनाची तयारी पूर्ण झाली आहे. नागाळा पार्क येथील राजहंस प्रिंटिंग प्रेससमोरील आर. व्ही. मैदानावर 12 ते 16 ऑक्टोबर या कालावधीत सकाळी 10 ते रात्री 8 या वेळेत हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले राहणार आहे. या प्रदर्शनासाठी रॉनिक इन्स्टंट वॉटर हीटर सिस्टीम सहप्रायोजक आहे.

नवरात्रौत्सवापाठोपाठ आबालवृद्धांना दसरा आणि दिवाळी सणाची उत्सुकता लागून राहिली आहे. मराठी संस्कृतीतील सर्वात मोठे सण म्हणून यांना विशेष महत्त्व आहे. या सणानिमित्त प्रत्येकाला खरेदीचे वेध लागतात. सणांमध्ये प्रत्येक जण स्वत:साठी, आपल्या कुटुंबासाठी, ऑफिससाठी काही ना काही खरेदी करतो. खरेदीच्या तयारीत असणार्‍यांना या प्रदर्शनात भरपूर व्हरायटी, नावीन्यपूर्ण प्रॉडक्टस् आणि खरेदीचा मनसोक्त आनंद लुटता येणार आहे. 

ऑफर्सची बरसात

दर्जेदार कंपन्यांची उत्पादने आणि भरघोस सवलती हे फेस्टिव्हलचे वैशिष्ट्य आहे. या प्रदर्शनात सहभागी स्टॉलधारकांकडून खरेदीवर ऑफर्सची बरसात करण्यात आली आहे. त्यामुळे खरेदीचा आनंद आणखी द्विगुणीत होणार आहे. पाच दिवस सुरू राहणारे हे प्रदर्शन कोल्हापूरकरांसाठी पर्वणीच असणार आहे. या प्रदर्शनामुळे लोकांचा वेळ आणि पैसा नक्कीच वाचणार आहे. तरी करवीरवासीयांनी या प्रदर्शनाला भेट देण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे. 

गृहोपयोगी वस्तू एकाच छताखाली

दसरा-दिवाळीसाठी या प्रदर्शनात गृहोपयोगी वस्तूंची रेलचेल असणार आहे. यामध्ये वॉटर हीटर, टीव्ही, इलेक्ट्रॉनिक व इलेक्ट्रिक वस्तू, किचन ट्रॉली, इमिटेशन ज्वेलरी, फॅन्सी ड्रेस, आयुर्वेदिक हेल्थ केअर प्रॉडक्ट, सौंदर्यप्रसाधने, मसाल्यांचे पदार्थ, रिलॅक्स चेअर, खाद्यतेल, अगरबत्ती, नोट काऊंटिंग मशिन, व्यायाम साहित्य, पडदे, अशा गृहोपयोगी वस्तूंचे स्टॉल असणार आहेत.