Sat, Jul 04, 2020 18:39होमपेज › Kolhapur › कोल्हापूर : कोरोनाच्या धक्क्यात दिलासा, २८२ रूग्णांना डिस्चार्ज

कोल्हापूर : कोरोनाच्या धक्क्यात दिलासा, २८२ रूग्णांना डिस्चार्ज

Last Updated: Jun 03 2020 2:51PM

संग्रहित छायाचित्रकोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा 

जिल्ह्यातील रुग्णवाढीचा आलेख वाढत असतानाच कोरोनामुक्‍तीचे प्रमाणही दिवसागणीक वाढले आहे. आज कोरोनाचे दोन रूग्ण सापड्याने जिल्ह्याचा आकडा ६३२ झाला. तर ३४४ पैकी २८२ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून सध्या कोल्हापूर जिल्ह्यासाठी हे दिलासादायक चित्र आहे.                       

आजअखेर ६३२ रूग्णांपैकी २८२ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज सकाळी १० वाजता ७४ प्राप्त अहवालांपैकी ७३ अहवाल निगेटिव्ह (६३० पैकी यापूर्वीच्या एकाचा दुसरा अहवालही पॉझिटिव्ह आहे, असे मिळून एकूण ७४) तर आज बुधवार दुपारी दोघांचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे. आजअखेर जिल्ह्यात एकूण ३४४ पॉझिटिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. सी. केम्पी-पाटील यांनी आज दिली.

कोल्हापूर : नव्या दोन कोरोनाग्रस्त रुग्णांची वाढ

आजअखेर तालुका, नपा आणि मनपा क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे - आजरा- ५१, भुदरगड- ६५, चंदगड- ७१, गडहिंग्लज- ६७, गगनबावडा- ६, हातकणंगले- ६, कागल- ५३, करवीर- १२, पन्हाळा- २४, राधानगरी- ६३, शाहूवाडी- १६८, शिरोळ- ७, नगरपरिषद क्षेत्र- ११, कोल्हापूर महापालिका क्षेत्र-२१ असे एकूण ६२३ आणि पुणे -१, सोलापूर-३, कर्नाटक-२ आणि आंध्र प्रदेश-१ इतर जिल्हा व राज्यातील सात असे मिळून एकूण ६३२ रुग्णांची आजअखेर जिल्ह्यात संख्या आहे. 

जिल्ह्यातील एकूण ६३० रूग्णांपैकी २८२ रूग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर एकूण ६ जणांचा मृत्यू झाला असल्यामुळे आजअखेर जिल्ह्यातील रूग्णांची संख्या ३४४ इतकी आहे.