होमपेज › Kolhapur › ...आता खा. राजू शेट्टी यांनी राजकारण सोडावे : ना. खोत

...आता खा. राजू शेट्टी यांनी राजकारण सोडावे : ना. खोत

Published On: Feb 27 2018 2:04AM | Last Updated: Feb 27 2018 1:15AMइस्लामपूर : वार्ताहर

खासदार राजू शेट्टी यांचा खोटे बोलण्यात हातखंडा आहे. गेली आठ वर्षे ते दोन सरकारी शस्त्रधारी शरीररक्षक घेऊन फिरत आहेत. मग हे संरक्षण नव्हे तर काय? तुमच्यात जरा जरी पावित्र्य असेल, तर आता राजकारण सोडा, असा पलटवार ना. सदाभाऊ खोत यांनी केला आहे.

ना. खोत म्हणाले, शेट्टी यांच्या पायाखालची वाळू आता सरकू लागली आहे. पराभव समोर दिसू लागल्याने ते काहीही बोलत आहेत. खासदारकी वाचविण्यासाठी साखर कारखानदारांच्या गळ्यात गळे घालत आहेत. ते म्हणतात, मी कोणाचे संरक्षण घेऊन फिरत नाही. हे साफ चुकीचे आहे. कारण गेली आठ वर्षे ते खासदार आहेत. तेव्हापासून त्यांना सरकारी संरक्षण आहे. दोन शस्त्रधारी शरीररक्षक नेहमी त्यांच्यासोबत असतात. हे संरक्षण नव्हे तर काय? मला तर मंत्री झाल्यावरच संरक्षण मिळाले आहे. आता त्यांचा खोटारडेपणा  सिद्ध झालाय. त्यामुळे त्यांनी राजकारण सोडावे.