Tue, Sep 17, 2019 03:38होमपेज › Kolhapur › गुढी पाडव्यापासून वाचक-प्रेक्षकांच्या भेटीला पुढारी वेबचे ऑडिओ बुलेटीन (video)

गुढी पाडव्यापासून वाचक-प्रेक्षकांच्या भेटीला पुढारी वेबचे ऑडिओ बुलेटीन (video)

Published On: Apr 05 2019 7:10PM | Last Updated: Apr 06 2019 11:23AM
कोल्हापूर : पुढारी ऑनलाईन 

दै. पुढारीच्या वेब आवृत्तीला वाचक प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळत आहे. गुढी पाडव्याच्या निमित्ताने वेब आवृत्तीवर 'पुढारी वेबचे ऑडिओ बुलेटीन' असा अभिनव उपक्रम सुरू करत आहोत. यामध्ये अत्यंत मोजक्या शब्दात दिवसभरातील ठळक घडामोडी शब्दबद्ध करुन त्याचे ध्वनिमुद्रण करण्यात येईल. हे ऑडिओ बातमीपत्र दररोज संध्याकाळी पुढारी वेबच्या वाचक-प्रेक्षकांसाठी उपलब्ध करुन देण्यात येईल.  

दै. पुढारी, पुढारी ऑनलाईनबरोबरच पुढारीच्या ऑनलाईन आवृत्तीमधील या ऑडिओ बुलेटिनला उत्तम प्रतिसाद मिळेल यात शंकाच नाही. वाचक-प्रेक्षकांच्या सूचनांच्यानुसार या बुलेटिनमध्ये वेळोवेळी बदलही करण्यात येतील. जेणेकरुन हे बुलेटिन वाचक प्रेक्षकांच्या अधिकाधिक पसंतीस उतरेल.

पुढारीच्या वेब आवृत्तीमध्ये प्रामुख्याने 'रियल टाईम न्यूज'वर भर देण्यात येतो. बातमी घडताच क्षणी किंबहुना घडताना त्यातील वेळोवेळीच्या अपडेटसह वाचकांच्या हाती देण्याचा पुढारीचा प्रयत्न राहिला आहे. त्यामध्ये पुढारीने सातत्य राखले आहे. अधिक वेगवान बातम्या देण्याचा नेहमीच पुढारीचा प्रयत्न असतो. त्यामुळेच वाचकवर्ग अचूक आणि सविस्तर बातमीसह 'टाईमली अपडेट'साठी पुढारीला प्रतिसाद देताना आढळतात.

पुढारीच्या यू ट्यूब चॅनेलचे सबस्क्रायबर नुकतेच ७५ हजारांच्यावर गेले आहेत. तसेच फेसबुक आणि ट्विटर हँडललाही मोठा प्रतिसाद मिळत आहे. ऑडिओ बुलेटिनलाही उत्तम प्रतिसाद मिळेल हाच या नववर्षदिनाचा संकल्प. 

WhatsApp वर बातम्या मिळवण्याकरीता ८८०५००७७२२ हा नंबर तुमच्या मोबईलमध्ये पुढारी या नावाने सेव्ह करा आणि खालील लिंकवर क्लिक करून WhatsApp ग्रुप जॅाईन करा.
https://chat.whatsapp.com/DmOJLDvGACrHCXh0bqURex